पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात दिराने वहिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पारोळा पोलिसांत पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २६ मे रोजी सकाळी ८:३० पिडीता व त्यांचा मुलगा शेतात काडी कचरा वेचून जाळण्यासाठी गेले होते. यावेळी पिडीतेच्या १३ वर्षीय मुलाला दिराने विहिरीवर पाणी घेण्यासाठी पाठविले व पिडीतेसोबत अश्लील संवाद करत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच पिडीतेस लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ जयवंद पाटील हे करीत आहेत.