फैजपूर (प्रतिनिधी) शहरातील बसस्थानाच्या मागे असलेल्या मिरची ग्राऊंड येथे सहा वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करत बापाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेमुळे फैजपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, निलेश घनश्याम बखाल (वय-३५ रा. विवरे ता. रावेर ह.मु. बसस्थानकच्या मागे मिरची ग्राऊंड, फैजपूर ता. यावल) हे आपल्या पत्नी व सहा वर्षाचा मुलगा आर्यन सोबत वास्तव्याला आहे. फैजपूर शहरातील बापू डेअरीचे संचालक आहेत. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांनी पत्नीला बाजार व किराणा आणण्यासाठी बाजारात सोडले. त्यानंतर ते घरी गेले. दरम्यान ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला. निलेश बखाल यांनी त्यांचा सहा वर्षाचा मुलगा आर्यन याचा गळा दाबून खून केला आणि स्वतः दोरी गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांची पत्नी घरी आल्यावर घराचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले.
दरवाजा ठोठावून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजारचांच्या मदतीने दरवाजा उघडला असता दोघांचे मृतदेह आढळून आल्याने पत्नीचा जबर धक्का बसला आहे. तातडीने दोघांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी मयत घोषीत केले. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. यावेळी रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती.