TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : कुटुंबातील पाच जणांची विष देऊन केली हत्या, सून आणि मामीला अटक !

कारण वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का ; इंटरनेटवर सर्च केले विषारी द्रव !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गडचिरोली (वृत्तसंस्था) अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथील कुंभारे कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबातीलच दोन महिलांना अटक करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. संघमित्रा कुंभारे व रोजा रामटेके अशी आरोपींची नावे आहेत. कुंभारे कुटुंबातील पाच जणांना घरातीलच सुनेने नवऱ्याच्या मामीच्या मदतीने सुडापोटी एकेकावर अन्नपाण्यात विष मिसळून पाचजणांचा शांत डोक्याने त्यांचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

नेमकं काय घडलं !
शंकर तिरुपती कुंभारे (५५, रा. महागाव (बु.) ता. अहेरी) यांचे गावात फर्निचरचे दुकान होते. पत्नी विजया कुंभारे (४९) मुलगा सागर (३२), रोशन (२९) व विवाहित मुलगी कोमल विनोद दहागावकर (३१) असे शंकर कुंभारे यांचे कुटुंब होते. यातील सागर हा दिल्ली येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. २२ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री जेवण केल्यानंतर विजया शंकर कुंभारे यांना अवस्थ वाटू लागल्याने पती शंकर कुंभारे यांनी त्यांना आलापल्ली येथील रुग्णालयात नेले. दरम्यान, काही वेळातच शंकर यांचीही प्रकृती अवस्थ वाटू लागली. त्यामुळे महागाव येथील राकेश मडावी या वाहनचालकाने विजया व शंकर या दोघांनाही रुग्णालयात नेले. मात्र, २६ सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दिवशी २७ सप्टेंबर रोजी पत्नी विजयाच मृत्यू झाला. दोघांच्या अंत्ययात्रेला मुलगी कोमल दहागावकर, मोठा मुलगा सागर व विजया कुंभारे यांची बहीण आनंदा उराडे आले होते. परंतु पुढे या तिघांचीही प्रकृती खालावली. सोबतच मुलगा रोशन व वाहनचालक राकेश मडावी यालाही अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे सर्वजण रुग्णालयात भरती झाले. उपचार सुरू असताना मुलगी कोमल दहागावकर हिचा ८ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी आनंदा उराडे यांचाही मृत्यू झाला. तसेच लहान मुलगा रोशन कुंभारे याचा १५ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला.

READ ALSO

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती !
एकामागून एक कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे अहेरी तालुक्यात विविध चर्चांना पेव फुटले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, अहेरीचे ठाणेदार मनोज काळबांडे व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी व त्यांच्या तपास पथकास हा गुन्हा उघडकीस आणण्याची जबाबदारी सोपवली. तपास यंत्रणेने तत्काळ वेगवेगळी चार तपास पथके गठित करून त्यांची परिसरातील गोपनीय यंत्रणा सक्रिय केली. गोपनीय सूत्रांकडून संघमित्रा कुंभारे व रोजा रामटेके यांचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यांना १८ ऑक्टोबर २०२३ रोजी ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता, त्या दोघींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये मिसळले विष !
संघमित्रा कुंभारे हिने रोशन कुंभारे याच्याशी तिच्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केले व या कारणामुळे तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. तसेच याबाबत पती रोशन व सासरची मंडळी तिच्या माहेरच्या लोकांच्या नावे वारंवार टोमणे मारत असत. सहआरोपी रोजा रामटेके हिने तिच्या सासऱ्याच्या नावे असलेल्या शेतजमिनीत शंकर कुंभारे यांची पत्नी विजया कुंभारे व तिच्या इतर बहिणीचा हिस्सा मागून नेहमी वाद करत असल्याच्या कारणावरून त्या दोघींनी संपूर्ण कुंभारे कुटुंब व त्यांच्या नातलगांना विष देऊन जिवे मारण्याची योजना आखली. त्याप्रमाणे रोजा रामटेके हिने तेलंगणा राज्यात जाऊन विष आणले व ते विष जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्या दोघींनी मृतांच्या व आजारी व्यक्तींच्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये मिसळले. त्या विषाचा हळूहळू परिणाम होऊन त्या सर्व व्यक्ती एकापाठोपाठ आजारी पडण्यास सुरुवात झाली. यात पाच व्यक्तींचा मृत्यू झाला. राकेश मडावी हा शंकर कुंभारे यांच्या कुटुंबातील नव्हता, परंतु तो त्यांच्या वाहनातील पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमधील पाणी प्यायल्याने विषबाधा होऊन तो आजारी पडला.

इंटरनेटवर सर्च केले विविध विषारी द्रव !
संघमित्राच्या मोबाईलमध्ये घातक विषारी द्रव सर्च केल्याचे आढळले. त्यानुसार तिने तेलंगणा राज्यात जावून विष आणल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला तिने आढेवेढे घेतले, पण पोलिसांनी खाक्या दाखविताच दोघींनीही हत्याकांडाची कबुली दिली. सध्या रोशनच्या आई-वडिलांना दवाखान्यात नेणारा खासगी वाहनचालक राकेश अनिल मडावी (रा. महागाव) याच्यावर नागपूर, रोशनचा मावसभाऊ बंटी उराडे (रा. बेझगाव, ता. मूल, जि. चंद्रपूर) याच्यावर चंद्रपूर व रोशनचा भाऊ राहुल हा दिल्लीत उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

पहिल्या विषप्रयोगासाठी आखला खास चिकनचा बेत !
संघमित्रा हिने विषप्रयोगाचा सर्वात पहिला प्रयोग नणंदेवर केला. नणंद कोमल दहागावकर हिचे पती बाहेरगावी असल्याची संधी साधून संघमित्रा घरी चिकनचा बेत केला, त्यात विषारी द्रव मिसळले व डबा घेऊन कोमलच्या घरी गेली. चिकन खाल्ल्यानंतर कोमलची तब्येत खालावली. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा होत असतानाच तिच्या आई-वडिलांचा विषप्रयोगाने मृत्यू झाला, त्यानंतर कोमलची प्रकृती पुन्हा बिघडली व त्यातून ती सावरलीच नाही, शेवटी तिचाही मृत्यू झाला. दरम्यान, मृत्यू पावलेल्या पाच व्यक्ती आणि सध्या उपचार घेत असलेल्या तीन व्यक्तींमध्ये हातापायाला मुंग्या येणे, कंबरेखालील भागामध्ये आणि डोक्यामध्ये प्रचंड वेदना, ओठ काळे पडून जीभ जड पडणे यासारखे एकसमान लक्षणे दिसून आली. सदर लक्षणावरुन मृत आणि आजारी व्यक्तींना कुठलीतरी विष बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी वर्तवला होता. हाच धागा पकडत पोलिसांना हत्याकांडाचे गूढ उकलण्यात यश आले.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
Next Post

खडसेंसह कुटुंबियांना तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, जाणून घ्या...नेमकं काय आहे प्रकरण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोहरादेवी येथील गर्दीबाबत कारवाई होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

February 24, 2021

खर्दे व परिसरातील शिव रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार !

January 4, 2024

अनोरे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला रस्त्याच्या कामाच्या वादातून मारहाण ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

December 26, 2022

हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नाही तर जमिनीवरून करतोय ; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

May 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group