एरंडोल (प्रतिनिधी): शेजारी राहणाऱ्या मामाने चार वर्षीय भाचीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अत्याचार करणाऱ्या नराधमासह एरंडोल पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका भागात चार वर्षीय चिमुकली वास्तव्यास असून त्यांच्याघराशेजारीच तीचा मामा देखील वास्तव्यास आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास चिमुकली घरी एकटी असल्याचे पाहून संशयिताने तीला स्वतःच्या घरी नेले. त्याठिकाणी चिमुकलीसोत घृणास्पद कृत्य करीत तिच्यावर अत्याचार केला.काही वेळानंतर चिमुकल्या मुलीची आई घरी आल्यानंतर तिला मुलगी दिसून न आल्याने तीने आजूबाजूला असलेल्या घरांमध्ये तिचा शोध घेतला. यावेळी तिला भावाच्या घरात चिमुकली मिळून आली. दरम्यान, चिमुकलीला घेवून तीची आई, वडीलांनी तात्काळ एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेतली. याठिकाणी त्यांनी तक्रार दिली असून त्यानुसा संशयित मामा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संशयिताला अटक देखील करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
संतप्त नातेवाईकांनी रोखून धरला महामार्ग
मामा भाचीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी संशयित आरोपीला आमच्या ताब्यात द्या, या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. याप्रसंगी डीवायएसपी विनायक कोते यांनी आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.















