जळगाव (प्रतिनिधी) एकाच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीला खोटे नाव सांगत तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिच्यासोबत फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान शब्बीर मण्यार (रा. साक्री जि. धुळे), इकबाल गौस मोहम्मद खान (रा. पाथरी जि.परभणी, ह.मु. आदर्श नगर, जळगाव), अशी संशयित आरोपींची नावं आहेत. ते सध्या शिक्षणानिमित्त मोहाडी रोडवरील लायन्स हॉल परिसरात वास्तव्याला आहेत.
शहरातील एका नामांकित महाविद्यालयात एक २० वर्षीय तरुणी शिक्षण घेत आहे. एप्रिल २०२२ मध्ये महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये बसलेले असताना विद्यार्थिनीची एका विद्यार्थ्याशी ओळख झाली. तरुणाने स्वतःचे नाव जंक उर्फ सागर सोनवणे (रा.साक्री, ता. धुळे) असे सांगितले. सिनियर असल्याने दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले. काही दिवसांनी दोघे इंस्टाग्रामला भेटले असता तरुणाचे नाव इमू मन्वार असल्याचे तिला दिसले. तरुणीने याबाबत विचारणा केली असता मुस्लीम मुलांशी मुली बोलत नाही, म्हणून नाव खोटे सांगितले असे तो म्हणाला. तसेच स्वतःचे नाव इमान शब्बीर मन्यार असल्याचे त्याने सांगितले.
महाविद्यालय प्रोजेक्ट आणि इतर शैक्षणिक कामानिमित्त दोघे भेटत असताना त्याने विद्यार्थिनीसोबत सेल्फी काढले. जून- जुलै २०२२ मध्ये प्रोजेक्टच्या कामानिमित्त इमानने विद्यार्थिनीला तो राहत असलेल्या रामानंद नगर स्टॉप जवळील खोलीवर बोलाविले. त्याठिकाणी असलेल्या इम्रानचा मित्र इक्वाल याच्यासोबत ओळख करून दिल्यावर तो निघून गेला. काही वेळाने इक्बालने विद्यार्थिनीसोबत अंगलट करण्याचा प्रयत्न करीत सेल्फी काढले. विद्यार्थिनीने ते डिलीट करण्याचे सांगितले असता त्याने काही होत नाही म्हणून नकार दिला.
तीन दिवसांनी पुन्हा त्याने विद्यार्थिनींना फोन करून भेटण्यास बोलाविले तिने नकार दिला असता त्याने फोटो आई – वडील, मित्र मैत्रिणींना आणि इतरत्र व्हायरल करण्याची धमकी दिली. भीतीपोटी मुलगी भेटायला गेली असता त्याने जबरदस्ती तिच्यावर अत्याचार केला. ऑगस्ट-सप्टेंबर २०२२ मध्ये पुन्हा त्याने मुलीला फोन करून अजिंठा चौफुली जवळ एका हॉटेलवर भेटण्यास बोलाविले. मुलीने नकार दिला असता गेल्यावेळी आपल्या संबंधांचे फोटो माझा मित्र इकबाल याने काढले असून ते त्याने दाखविले. तेव्हा देखील त्याने विद्यार्थिनीवर अत्याचार केला.
यानंतर तू माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी तो नेहमी धमकी देत होता. १३ ऑगस्ट २०२३ पासून त्याने पुन्हा फोटो, मेसेज करून धमकविण्यास सुरुवात केली. अत्याचार असह्य न झाल्याने तरुणाने घडलेला प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने तिच्या भावाला प्रकार सांगितल्यावर प्रकार उघड झाला आणि रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रामानंद नगर पोलिसात रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलिसात इमरान शब्बीर मन्यार आणि इक्बाल खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही मूली पीडित असण्याची शक्यता व्यक्त होत असून इम्रान याच्याकडून ४ मोबाईल, एक लॅपटॉप हस्तगत केला आहे.