TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात धाडसी चोरी ; बंद घर फोडून चोरट्यांनी लांबवले साडेसहा तोळे सोने !

vijay waghmare by vijay waghmare
September 6, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) हॉस्पिटलमध्ये ड्यूटीवर गेलेल्या परिचारिकेच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरुमधील लोखंडी कपाटातील सामान अस्तव्यस्त फेकला. मात्र चोऱ्यांना काहीच मिळून आले नाही. त्यानंतर चोरट्यांनी किचन ओट्याखाली ठेवलेल्या गोणीतील भांडे उपसून त्यामध्ये कापडात गुंडाळून ठेवलेले पावणे तीन लाख रुपयांचे साडेसहा तोळे सोने चोरुन नेले. ही घटना गुरुवारी सकाळी भोईटेनगरात उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कडीकोयंडा तोडून आत केला प्रवेश !
शहरातील भोईटे नगरातील गुरुपार्क येथे अनिता रमेश दप्तरी (वय ७३) या वृद्ध महिला वास्तव्यास आहे. त्यांच्या पतीचे दोन वर्षापूर्वी निधन झाले असून दोन मुली विवाहित आहेत. मोठी मुलगी नाशिक तर लहान मुलगी भुसावळ येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे अनिता दप्तरी या एकट्याच राहतात. त्या शहरात एका खाजगी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून नोकरी करीत होत्या. नेहमीप्रमाणे बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी त्या घराच्या दरवाजाला कुलूप लावून ड्युटीवर निघून गेल्या. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कुलूप बंद असलेल्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

भांडे भरुन ठेवलेल्या गोणीतून दागिने लागले हाती !

चोरट्यांना कपाटात काही मिळून न आल्याने त्यांनी किचनमधील साहित्याची शोधाशोध केली. यावेळी त्यांना किचन ओट्याच्या खाली सिलेंडरच्या बाजुला भांडे भरुन ठेवलेली गोणी होती. ही गोणी सोडून चोरट्यांनी त्यातील सामान बाहेर काढला. या गोणीत फडक्यामध्ये बांधलेले दागिने चोरट्यांचे हाती लागले आणि ते दागिने घेवून चोरटे पसार तेथून पसार झाले. या गाठोड्यात महिलेने दोन तोळ्याचा चपला हार, २६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, दीड ग्रॅम वजनाची चैन, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा सुमारे साडेसात तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. देवघरात ठेवलेला चांदीचा गणपती, चांदीचा महादेव तसेच चांदीचा पेला, चांदीची वाटी, निरंजन, चार नग चांदीचे करंडे हेही चोरुन नेले.

श्वानपथकासह ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी !
सकाळच्या सुमारास शेजारी राहणाऱ्यांच्या ही घटना लक्षात येताच, त्यांनी घटनेची माहिती दप्तरी यांना दिली. त्यानुसार त्यांनी घराच्या दिशेने धाव घेतली. यावेळी घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, डीबी कर्मचारी, श्वान पथक, फिंगर प्रिंट तज्ञ भोईटेनगरात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथकाने दप्तरी वांच्या घरापासून लांबपर्यंत मार्ग दाखविला. परंतू त्याठिकाणाहून चोरटे वाहनातून पसार झाले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. परिसरात सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात आहे. या प्रकरणी अनिता दप्तरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डब्यातील रोकड राहिली सुरक्षीत !
मंगळवारी परिचारिका असलेल्या अनिल दप्तरी यांना पगार मिळाला होता. त्यांनी पगाराचे पैसे त्यांनी किचनमधील एका स्टीलच्या डब्यात ठेवले होते. मात्र चोरट्यांनी डब्याला हात न लावल्यामुळे त्यांची पगाराचे पैसे सुरक्षीत राहिले. तसेच दुसऱ्या एका डब्यात नेहमी वापरासाठी शंभर रुपयांच्या नोटा ठेवल्या होत्या. त्यानांही चोरट्यांनी स्पर्श केला नसल्याची माहिती अनिता दप्तरी यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
Next Post

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री ; पोलिसांनी कुंटणखाना केला उद्ध्वस्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अजितदादांच्या रुपाने आपण “मास लीडर” गमावला…

February 1, 2026

जळगाव कृउबा सभापतीपदी नाट्यमय घडामोडीनंतर श्यामकांत सोनवणेंनी मारली बाजी !

May 20, 2023

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले २१७ कोरोनाबाधित, ८९ झाले बरे !

January 17, 2022

जैन इरिगेशनचा नऊ महिन्यांत ₹४०३०.६ कोटींचे एकूण उत्पन्न

January 31, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group