जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात मद्यधुंद पत्नीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे दाम्प्त्याने आधी एकत्र मद्यपान केले होते. त्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला आणि नंतर मद्यधुंद पत्नीने पतीचा गळा आवळला, त्यानंतर पतीचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती-पत्नी दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन आहे. मंगळवारी रात्रीही दोघं मद्यधुंद अवस्थेत होते. यावेळी दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. त्यानंतर मंजूने पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या. तो गाढ झोपेत असताना तिने बेल्टने त्याचा गळा दाबल्याची माहिती आहे. यावेळी अनिल जागीच गतप्राण झाला. अनिलच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत मंजूची चौकशी केली. यावेळी तिने हत्येची कबुली दिली.