पुणे (वृत्तसंस्था) आजारपणाला कंटाळून एका युवकाने आत्महत्या ( Commits Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात (Maval Taluka) ही घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या युवकाला मधुमेह (Diabetes) झाला होता. याच आजाराला कंटाळून युवकाने टोकाचे पाऊल उचलले. गणेश मनिकम (Ganesh Manikam) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव (Pune Crime) आहे.
आजारपणाला कंटाळून गणेश मनिकम याने आत्महत्या केल्याची माहिती आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात हा प्रकार घडला. गणेशला उच्च मधुमेह आजाराने ग्रासले होते. हाय डायबिटीजमुळे तो वैतागल्याचंही बोललं जातं. गणेशने गळफास घेऊन आत्महत्या केली. अमरजाई देवी मंदिराच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी त्याचा मृतदेह आढळला.
एका बातमीदरा मार्फत देहूरोड पोलीस स्टेशनला एक अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत अमर जाई देवी मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस डोंगराच्या पायथ्याशी झाडाला लटकून आहे अशी बातमी मिळताच देहूरोड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी धाव घेतली. शहानिशा केली असता वयाचा अंदाजाने त्याचप्रमाणे कपड्यांचा रंगावरून हा इसम बेपत्ता असलेला 42 वर्षीय गणेश मनिकम आहे असा अंदाज वर्तवला. मात्र पोलिसांनी गणेश मनिकम याच्या घरच्यांना फोन करून मृतदेहाची शहानिशा करण्यासाठी बोलावलं असता घरच्यांनी या गोष्टीची पुरती केली की हा गणेश मनिकम आहे.
मी आत्महत्या करायला जात आहे
गणेश मनिकम हा 42 वर्षीय युवक देहू रोड गांधी नगर येथील राहणारा असून मागील काही दिवसांपासून तो घरातून बेपत्ता होता त्याची बेपत्ता असल्याची तक्रार देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये 22 एप्रिल ला नोंदविण्यात आली आहे, गणेश याला हाय शुगर चा आजार होता व या आजाराला व त्याच्या त्रासाला कंटाळून तो घरातून निघून गेला होता निघून जात असताना गाईच्या वासरु बांधणारी रशी तो सोबत घेऊन गेला होता व मी आत्महत्या करायला चाललो आहे असं घरच्यांना बोलून गेला होता पोलिसांनी अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला मात्र यामध्ये पोलिसांना यश प्राप्त झाला नाही आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा शव बेपत्ता गणेश मनिकम याचाच आहे असं कन्फर्म झाला.