पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील विवाहिता घरी असल्याचा फायदा घेत एकाने धमकी देत जबरदस्ती बलात्कार केला. त्यानंतर काढलेले अश्लिल फोटो तूझ्या पतीला आणि सासू सासऱ्यांना दाखवेल अशी धमकी देत वेळोवेळी जबरी संभोग केला. तसेच पती व सासऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात २१ वर्षीय पिडीत विवाहीतेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुमारे दिड महिन्यापूर्वी पती, सासू-सासरे व दिर शेतात गेलेले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास विवाहिता घरी एकटी असल्याचे बघून वैभव ईश्वर चौधरी हा घरात आला व त्याने तोंड दाबले आणि तू ओरडली तर विचार कर, असे बोलून पिडीतेसोबत जबरदस्ती शरीर संबंध केले. त्यावेळी वैभवने त्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे फोटो देखील काढले. यानंतर वैभव चौधरी याने पिडीत विवाहितेच्या व्हॉट्सअपवर मॅसेज करुन काढलेले फोटो तुझ्या नवऱ्याला व सासू सासऱ्यांना दाखवेल तसेच तुझ्या मुलाला मारुन टाकेल, अशी धमकी देत पिडीतेच्या ईच्छेविरुध्द वेळोवेळी जबरी संभोग केला.
तसेच दि. ७ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पिडीता घरी एकटी असतांना वैभव हा पुन्हा एकदा पिडीतेच्या घरात घुसला. परंतू तेवढ्यात लागलीच पिडीतेचे सासू-सासरे व पती शेतातून घरी परत आले. पिडीतेचा पती व सासरे यांनी वैभवला तू आमच्या घरात का आला? असे विचारले असता त्याने पिडीतेच्या पती व सासऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरडाओरड एकून वैभवचा चुलत भाऊ ऋशि ज्ञानेश्वर चौधरी हा हातात लाकडी काठी घेऊन आला व त्याने पिडीतेच्या पतीच्या डोक्यात काठी मारली. तसेच सासू सासऱ्यांना देखील चापटा बुक्कयांनी मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघां संशयितापैकी वैभवला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अमोल पवार हे करीत आहेत.