TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : पाळधी येथे कापूस व्यापाऱ्याचा खून

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील तरुणावर अज्ञात टोळीने चाकू हल्ला करून खून केल्याची घटना पाळधी येथील साईबाबा मंदिराजवळ आज रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. कापूस व्यापारी असणाऱ्या या तरुणाकडे १५ लाखाची बॅग असल्याचीही माहिती समोर आली आहे. चाकूहल्ल्यात मृत्यू झालेल्या या व्यापाऱ्याचे नाव स्वप्नील रत्नाकर शिंपी (वय ३२) आहे.

यासंदर्भात अधिक असे की, स्वप्नील शिंपी हे दिलीप उर्फ गुडू राजेंद्र चौधरी (वय ३२, राफरकांडे) यांच्यासोबत भागीदारीमध्ये कापसाचा व्यापार करीत होते. आज हे दोघे भागीदार होंडा सिटी कारने (क्रमांक एम एच ०१ – ए एल ७१२७) जळगावला त्यांची रक्कम घेण्यासाठी आले होते जळगावला येऊन ते त्यांना मिळालेले व्यवसायातील जवळपास १० ते १५ लाख रुपये घेऊन माघारी गावी फरकांडे येथे त्यांच्या कारने निघाले होते.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

लुटीचा प्रयत्न फसला

पाळधीजवळ ते साईबाबा मंदिराजवळच्या पेट्रोल पंपाजवळ आले असता मोटारसायकलींवरून आलेल्या अज्ञात ४ ते ५ जणांच्या टोळक्याने शिंपी यांच्या होंडा सिटी कारला त्यांच्या मोटारसायकली आडव्या लावून कट का मारला म्हणून वाद घातला. शिंपी आणि त्यांच्या भागीदाराने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र कार चालवत असलेले स्वप्नील शिंपी यांना कारमधून खेचून या टोळक्याने बाहेर काढले त्यांच्या पाठीवर, मांडीवर चाकूने वार केले. या झटापटीत या टोळक्याने स्वप्निल दिलीप चौधरी यांच्या ताब्यातून पैशांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. दिलीप चौधरी व स्वप्नील शिंपी यांच्या प्रतिकारामुळे या टोळक्याचा पैसे हिसकावण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही आणि त्यांची ही रक्कम वाचली.

मदतीला लोक धावून आले

हा गदारोळ व आरडा ओरड सुरु असताना जवळच्या पेट्रोलपंपावर असलेले ३ ते ४ लोक या दोघांच्या मदतीला धावून आले. ते लोक येत असल्याचे पाहून सावध झालेल्या हल्लेखोरांच्या तावडीतून चौधरी थोडक्यात वाचले मदतीला आलेले लोक पाहून हे टोळके पसार झाले. स्वप्नील शिंपी गंभीर जखमी अवस्थेत दगड – विटांनी या टोळक्याचा प्रतिकार करत पाळधीच्या दिशेने मदत मिळावी या आशेने धावण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांचे जोडीदार दिलीप चौधरी हेही जमेल तसा या हल्लेखोरांचा हल्ला अडवण्याचा प्रयत्न करीत होते.

स्वप्नील शिंपी यांना डॉक्टरांनी मयात घोषित केले

मदतीला धावून आलेल्या लोकांच्या सहकार्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संस्थेच्या रुग्णवाहिकेतून स्वप्नील शिंपी यांना जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले असता सी एम ओ डॉ. कळसकर यांनी त्यांना मयत घोषित केले. स्वप्नील शिंपी यांचं पश्चात आई-वडील, पत्नी आणि २ मुली असा परिवार आहे. स्वप्नील चौधरी हे घरातील कर्ते आणि एकुलतेएक होते.

दरम्यान, पोलिसांनी तपास चक्रे फिरविली असता नेमका कुणी खून केला ? याचा तपास पोलीस करत आहेत. लवकरच संशयितांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्यासाठी कटकारस्थान सुरु : नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जि.प.च्या शिक्षण सभापतींच्या स्वीय सहाय्यकांच्या दालनातील स्लॅब कोसळला : सुदैवाने कोणीही जखमी नाही

June 21, 2021

नाशिक शहरात कडक लॉकडाऊनची घोषणा

May 10, 2021

चेन्नईची विजयी सलामी ; मुंबईवर ५ गडी राखून विजय

September 20, 2020

देशात गेल्या २४ तासांत आढळले ५०,६६७ कोरोनाबाधित !

June 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group