नांदेड (वृत्तसंस्था) एका १४ वर्षाच्या मुलीच्या असाह्यतेचा फायदा घेत नराधम डॉक्टरने सातत्याने बलात्कार केल्याची घटना नांदेडच्या (Nanded) किनवट गावात (village) घडली. पिडीतेचा गर्भपात झाल्याने ही घटना उघडकीस आली आहे.
डॉक्टर विकास सुंकरवार असे नराधम डॉक्टरचं नाव आहे. अल्पवयीन असलेली पिडीत मुलगी ही वर्षे भरापासून किनवट येथील डॉ. विकास सुंकरवार यांच्याकडे साफसफाईच्या कामाला होती. असाह्यतेचा आणि वेगवेगळे अमिष दाखवून डॉक्टरने अनेक वेळा तिच्यावर बलात्कार आहे. यातून ती ४ महिन्याची गर्भवती राहिली. पोट दुखत असल्याने तिला दवाखान्यात दाखल केले असता बाथरुम मध्येच तिचा गर्भपात झाल्याने बलात्काराची संपूर्ण घटना उघडकीस आली आहे.
पिडीतेचा इन कॅमेरा जबाब नोंदवून डॉ. सुंकरवार विरोधात किनवट पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सुंकरवार याला न्यायालयाने १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.. डॉक्टर सुंकरवारच्या या कुकर्मामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.















