ग्वाल्हेर (वृत्तसंस्था) भाच्याने मित्राच्या मदतीने आपल्या मामीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये हा प्रकार घडला. मामीला घरी बोलावून दोघांनी हे दुष्कृत्य केलं. आरोपीने मामीला गुंगीचे औषध पाजले. मामीची शुद्ध गेल्यानंतर भाच्याने तिचे नग्न व्हिडिओ काढले. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मित्रासह बलात्कार (Mass atrocities) केला. तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय महिला पतीसोबत ग्वाल्हेरच्या गोल का मंदिर येथे असलेल्या हनुमाननगरमध्ये भाड्याने राहते. तिचा नवरा मजुरीचे काम करतो. त्यांचा भासा काही अंतरावरच राहतो. ९ जानेवारीला सायंकाळी भाच्याने मामीला फोन करून घरी येण्यास सांगितले. मामी भाच्याच्या घरी पोहोचली तेव्हा मित्र आकाश माहूर तिथे होता.
दोघांनी मामीला पिण्यासाठी पाणी दिले. यानंतर मामीला झोप येऊ लागली. त्याचवेळी भासा आणि मित्राने मामीचा न्यूड व्हिडिओ काढला. यानंतर दोघांनी मामीवर सामूहिक बलात्कार केला. दोन्ही आरोपींनी कोणालाही काही सांगितले तर व्हिडिओ व्हायरल करून पतीला ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर घाबरलेली महिला घरी परतली. मात्र, भाच्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
मामाच्या मोबाईलवर पाठवला न्यूड व्हिडिओ
मंगळवारी भाच्याने फोन करून मामीला पुन्हा घरी येण्यास सांगितले. मामी घरी आल्यानंतर शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. भाच्याने मामाच्या मोबाईलवर न्यूड व्हिडिओ पाठवला. महिलेच्या पतीने घरी पोहोचताच तिच्याशी वाद सुरू केला. त्यानंतर महिलेने प्रकार सांगितला. यानंतर दोघांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली. टीआय विनय शर्मा यांनी सांगितले की, आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.