जळगाव (प्रतिनिधी) एका ३२ वर्षीय महिलेचे मागील दोन वर्षापासून लैंगिक शोषण करणाऱ्या नंदुरबारच्या तरुणाविरुद्ध शहरातील रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद पोलिसात दिलेल्या फिर्यादीत पिडीतेने म्हटले आहे की, दीपक देवानंद टाक (रा.नंदुरबार) याने प्रेमाचे आमिष दाखवून पिडीतेच्या राहते घरी येऊन शारीरीक संबंध ठेवले. नंतर पिडीतेने संबंधास नकार दिला. त्यामुळे दीपकने आपले प्रेम संबंध आहेत. याबाबत सगळ्यांना सांगण्याची देण्याची धमकी देऊन वेळोवेळी पिडीतेच्या इच्छेविरुद्ध दोन वर्षापासून शारीरीक संबंध ठेवले. तसेच पिडीतेस व तिच्या मुलाला जिवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण, शिवीगाळ करून पैशाची मागणी केली. याबाबत भादवि कलम ३७६, ३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. शिल्पा पाटील ह्या करीत आहेत.