अकोला (वृत्तसंस्था) दहीगाव गावंडे येथील चाळीस लाखांची जबरी चोरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांमुळे अवघ्या चार तासात उघडकीस आली आहे. जबरी चोरीची रक्कम पोलिसांनी जप्त केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अवघ्या चार तासात गुन्ह्याची उकल !
रविवार दिनांक ३० जुलै २०२३ रोजी पोलिस स्टेशन बोरगाव मंजू हददीतील ग्राम दहिगाव गावंडे येथे जबरी चोरीचा प्रकार घडला. माहीती मिळताच अकोला एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या पथकातील सपोनि कैलास भगत व पोउपनि गोपाल जाधव, अंमलदारासह तात्काळ घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाची पाहणी केली आणि तपास चक्रे फिरवून आरोपीला तातडीने अटक केली. आरोपीकडून रक्कम जप्त करण्यात आली आहे.
संशयिताला अटक, रोकडही जप्त !
फियार्दी शुभम मुरलीधर गावंडे (२५) रा. दहीगाव गावंडे यांनी शेतविक्रीची रक्कम घरी कपाटात ठेवली होती. यादरम्यान ३ अनोखळी इसमानी चाकुचा धाक दाखवुन जबरीने ही रक्कम पळविली. रविवारी या घटनेने एकच खळबळ उडाली. बोरगाव मंजू पोस्टला यााबत कलम ३९४, ३४ भा.द.वि.प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास सुरू झालेला असताना, स्थानिक गुन्हे शाखेने हा तपास अवघ्या काही तासात पूर्ण केला. आरोपी ज्ञानेश्वर हिंमत सुर्वे (२५ रा. दोनद ता. बार्शीटाकळी जि. अकोला) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याचेजवळील जबरी चोरीतील रक्कम, मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायक (एम. एच. ३० बी. के. ७३५१) जप्त करण्यात आली आहे.
एलसीबीच्या पथकाने केली गुन्ह्याची उकल !
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक, अभयडोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पो. नि. शंकर शेळके, गोपाल जाधव, पोउपनि गोपीलाल मावळे, सफौ. दशरथ बोरकर, राजपाल ठाकुर, गणेशपांडे, पोहवा. गोकुळ चव्हाण, सुलतान पठाण, भास्कर धोत्रे, फिरोज खान, नापोकॉ. अविनाश पाचपोर, पो. कॉ. लिलाधर खंडारे, पो.कॉ. अन्सार शेख, पो. कॉ. स्वप्नील खेडकर, सतीश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, राहुल गायकवाड, ” चालक प्रशांत कमलाकर, अनिल राठोड, नफीस शेख यांनी केली आहे.
चोर आले, चाकू लावून लुटून गेल्याचा रचला बनाव !
वैभव गावंडे याने घरात तीन चोरटे शिरले. त्यांनी त्याला व बाळाला चाकू लावून घरातील ३९ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचा बनाव केला होता. त्यानंतर त्याने चोर आले, चाकू लावून रोकड लुटून गेले असे भाऊ शुभम गावंडे व कुटुंबीयांना सांगितले. परंतु त्याचा हा बनाव पोलिसांसमोर जास्त काळ टिकला नाही. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने साळ्याच्या मदतीने हा बनाव केल्याचे उघड केले.
एकास अटक, रोकड हस्तगत !
बोरगाव मंजू पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तातडीने दोनद येथे जाऊन आरोपी ज्ञानेश्वर हिंमत सुर्वे (२५) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३९ लाख ६९ हजार रुपयांच्या रोकडसह मोबाइल, दुचाकी हस्तगत केली. ही कारवाई सपोनि कैलास भगत, पोउपनि गोपाल जाधव, पोउपनि गोपीलाल मावळे, दशरथ बोरकर, राजपाल ठाकुर, गणेश पांडे, पोहवा. गोकुळ चव्हाण, सुलतान पठाण, भास्कर धोत्रे, फिरोज खान, अविनाश पाचपोर, लीलाधर खंडारे, अन्वर शेख, स्वप्नील खेडकर, सतीश पवार, आकाश मानकर, अभिषेक पाठक, मो. आमिर, राहुल गायकवाड, प्रशांत कमलाकर, अनिल राठोड, नफीस शेख यांनी केली