अमरावती (वृत्तसंस्था) घरगुती कारणातून पोटच्या मुलाने आईवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रजियाबी मस्तान शाह (७०) असे मृत महिलेचे, तर मंजूर शाह मस्तान शाह (३९) असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
मंजूर शाह हा काहीही कामधंदा करीत नसल्याने पत्नी मुलांना घेऊन माहेरी निघून गेलेली आहे. त्याला याला पत्नी, १५ वर्षीय मुलगी व १२ वर्षीय मुलगा आहे. मंजूर हा नेहमी आईशी वाद घालून शिवीगाळ करत मारहाण करीत होता. यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
यावेळी मंजूरने ईवर तीक्ष्ण शस्त्राने वार करीत तीचा खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी मुलाचा शोध सुरु केला. अवघ्या काही तासात मुलगा मंजूर शाह याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार स्वप्निल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात अतुल मस्के, विवेक घोरमाडे, चंद्रशेखर वानखेडे, ललित तायडे, संदीप लेकुरवाळे करत आहेत.