जयपूर (वृत्तसंस्था) वैज्ञानिक जगातही राजस्थानमधील काही भागात अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात आहे. विविध कारणांमुळे लोकं तंत्र-मंत्राची मदत घेतात. यात लगेच श्रीमंत होणं, मुलगा व्हावा म्हणून वा सूड उगवण्यासाठीही लोक मांत्रिकाकडे जातात. दरम्यान, एका मांत्रिकानं स्मशानातून ३० मुलांचे मृतदेह उकरून काढले. यात एका ११ वर्षांच्या मुलाचाही बळी गेला आहे.
तांत्रिकांनी आपल्या कृत्यांमध्ये अनेक निरागस मुलांचा जीव घेतला. गंभीर आजारापासून सुटका मिळवण्यासाठी गरम सळीने मुलांना चटका दिला. कोट्यवधी बनण्यासाठी ११ वर्षांच्या बाळाचा बळी दिला. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये दर वर्षी २०० हून अधिक अशी प्रकरणं येतात. तंत्र-मंत्रासाठी ५० हून अधिक लोकांना आपला जीव द्यावा लागतो. भीलवाड़ा, अलवर, चितोड़गढ़, करोली, बांसवाड़ा, डूंगरपुर ही ठिकाणं तांत्रिकांचा गड असल्याचं मानलं जातं.
मांत्रिकांनी ३० मुलांचा मृतदेह उकरून काढलं
श्रीगंगानगरमधील एका स्मशानात एका लहान मुलीचा मृतदेह पुरला होता. कुटुंब दुसऱ्या दिवशी स्मशानालं आले तर मुलीचा मृतदेह तेथे नव्हता. तर शेजारी दारूच्या बाटल्या, लाल कापड, भांडी दिसली. या घटनेनंतर तपास सुरू केला. यावेळी असं आढळलं की, अशा प्रकारे ३० बाळांचा मृतदेह उकरून काढण्यात आला होता. हाती लागलेल्या पुराव्यानुसार हे कृत्य मांत्रिकाचं असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.
















