जळगाव (प्रतिनिधी) फोटो एडीट करुन सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देत एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे पिडीता व विधीसंघर्ष बालक हे जळगाव शहरात एका खाजगी क्लासेसमध्ये JEE परिक्षेची तयारी करण्यासाठी क्लास लावलेला होता. जुलै २०२२ पासून ते मार्च २०२३ पावेतो या कालावधीत विधीसंघर्ष ग्रस्त बालकाने पिडीत विद्यार्थिनीचे फोटो एडीट करुन सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी देत पिडीतेसोबत वारंवार शरीरीक संबंध केले. या प्रकरणी भा.दं.वि कलम ३७६ (२) (N),५०६, सह बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि मिरा देशमुख ह्या करीत आहेत.