भुवनेश्वर (वृत्तसंस्था) वैवाहिक वाद मिटवण्याच्या बहाण्याने एका मांत्रिकाने सुनेवर ७९ दिवस बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका बंद खोलीतून महिलेची आणि तिच्या अडीच वर्षाच्या मुलाची पोलिसांनी (Police) सुटका केली आहे. पोलिसांना चकवा देवून मांत्रिक पळून गेला आहे. या महिलेने पती आणि सासरच्यांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या महिलेचे लग्न २०१७ मध्ये झाले होते. लग्नानंतर महिलेला हुंड्यासाठी सासरच्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली होती. यातून महिलेचे आणि सासरच्यांची भांडणं होतं होती. काही दिवसांनी सासरच्यांची एका मांत्रिका सोबत ओळख झाली. या मांत्रिकाने त्यांच्यातील वाद मिटवण्याचा बहाणा केला. यातून त्याने त्या महिलेला थोडे दिवस आपल्यासोबत राहण्यासाठी पाठवावे लागेल अशी अट घातली. सासरच्या मंडळींनी ही अट मान्य केली. महिलेला पाठवण्यास तयार झाले पण त्या महिलेने जाण्यास नकार दिला होता.
सासरच्या मंडळींना महिलेच्या जेवनात बेशुध्दचे औषध टाकून त्या महिलेला मांत्रिकाच्या हवाली केले. त्या महिलेसोबत तिचा अडिच वर्षाचा मुलगाही होता. या मंत्रिकाने महिलेला एका खोलीत डांबून ठेवले. मांत्रिक महिलेवर ७९ दिवस अत्याचार करत होता, असा आरोप महिलेने केला आहे.