TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे ‘श्री भगवान महावीर जयंती’ पालकमंत्री यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी !

ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अडीच लाखांची मदत समाज बांधवाकडे सपुर्द !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 4, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) ३ एप्रिल रोजी “भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव” निमित्त श्री सकल जैन संघ धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अडीच लाखांची मदत ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते जैन समाज बांधवाकडे सपुर्द करण्यात आली.

सकाळी ८ वाजता भ.महावीर चौकातून “अहिंसा रॅली” चे आयोजन करण्यात आले होते. सर्वात पुढे जैन समाजाचे संत उपस्थित होते व नंतर ४००/५०० पुरुष/महिला व तरुणांनी आपला सहभाग नोंदवला. अहिंसा रॅली मध्ये भ.महावीरांच्या जयघोषाने शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. या रॅलीनंतर श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात अध्यक्ष राहुल जैन तसेच संघपती सुमित संचेती, मूर्तिपूजक अध्यक्ष किशोर डेडीया यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झेंडावंदन करण्यात आले. तसेच भगवान महावीर जयंती निमित्त जैन संत आचार्य भगवंत यांचे प्रवचन झाले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

मान्यवरांची उपस्थिती !
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सकल जैन संघाचे अध्यक्ष अजयशेठ पगारीया यांनी केले. यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार अध्यक्ष राहुल जैन, किशोर डेडिया तसेच सुमित संचेती यांनी पुष्पहार, बुके व राजस्थानी पगडी देउन केला. याप्रसंगी मंचावर गुलाबराव वाघ, निलेश चौधरी, ज्ञानेश्वर महाजन,अॅड. संजय महाजन, सी.के.पाटील, कैलास माळी सर, विनय उर्फ पप्पु भावे, वासुदेव चौधरी, भानुदास विसावे, अॅड. वसंतराव भोलाने, सुरेश भागवत, विलास महाजन, वाल्मीक पाटील, राजेंद्र ठाकरे, संजय चौधरी, धिरेंद्र पुरभे, भरत चौधरी, दिपकभाऊ वाघमारे, रवि महाजन, विनोद रोकडे तसेच पोलीस निरीक्षक उध्दव ढमाले असे अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार जैन समाजाचे पंच व गो सेवा समितीतर्फे करण्यात आला.

अडीच लाखांची मदत ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते जैन समाज बांधवाकडे सपुर्द !
ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते इ.१० मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्व.लिलाबाई पुनमचंद पगारिया यांच्या स्मरणार्थ बक्षीस वितरण करण्यात आले. नंतर पालकमंत्री यांनी जैन समाज व भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव निमित्त आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले. अहिंसा, सत्य व त्याग या बद्दल जैन समाजाचे कौतुक करून हे सर्वांनी अंगीकारले पाहिजे,अशा भावना व्यक्त केल्या. तसेच शाकाहार हीच आजच्या काळाची गरज असल्याची भावना पण व्यक्त केली. नंतर पालकमंत्र्यांनी गो शाळेस ५१ हजार रोख मदत स्वतः दिली. तसेच व नगरपालिकाद्वारा २ लाखांचा चेक कामधेनू गोशाळेचे अध्यक्ष सी. एस. पाटील व राजू ओस्तवाल यांना सुपूर्द केला. त्यावेळी सकल जैन समाजाने टाळ्यांच्या गजरात पालकमंत्र्यांचे कौतुक केले.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत !
यानंतर काही प्रमुख मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यामध्ये गुलाबराव वाघ, भानुदास विसावे, ज्ञानेश्वर महाजन, कैलास माळी, कामधेनु गो सेवा मंडळातर्फे अध्यक्ष प्रा.सी.एस. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सकल जैन संघ धरणगाव व गो सेवा समितीतर्फे डॉ.मिलिंद डहाळे यांनी उपस्थित मान्यवर व सर्व गो सेवा म्हणून दान स्वरूपात देणगी देणाऱ्या सर्वांचे तसेच कार्यक्रमास उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

भगवान महावीर चौकाचे” भव्य उद्घाटन !
मंदिरातील कार्यक्रमानंतर “भगवान महावीर चौकाचे” भव्य असे उद्घाटन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आदिनाथ दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन, सचिव श्रेयान्स जैन,उपाध्यक्ष प्रतीक जैन, सावन जैन, अजयशेठ पगारिया, डॉ.मिलिंद डहाळे तसेच प्रवीण कुमट, संजय ओस्तवाल, बबलू कोठारी, सुशील कोठारी, राजमल संचेती, हेमंत ओस्तवाल, अक्षय मुथा, भानुदास विसावे, दिपक संचेती, भोलाने बापू,सकल जैन समाज बांधव व शहरातील मान्यवर मंडळी तसेच पत्रकार उपस्थित होते.

भव्य मिरवणूक !
दुपारी १२ वाजता भ.महावीरांचा पाळणा (जन्म महोत्सव) मंदिरात राजुलमती महिला मंडळाद्वारा साजरा करण्यात आला. व नंतर महाप्रसादाचे आयोजन मंदिराच्या परिसरात करण्यात आले होते. व सायंकाळी रथावर भगवान महावीरांचा फोटो लावून व रथ सजवून भव्य अशी मिरवणूक ढोल-ताश्यांचा गजरात काढण्यात आली. तरुण मंडळींनी लेझीम खेळून,व महिलांनी गरबा नृत्य सादर केले. त्यानंतर समारोप श्री आदिनाथ जैन मंदिरात करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सकल जैन समाजाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे योगदान मिळाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

April 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
Next Post

'जय श्रीराम' लिहिलेल्या वाहनातून गुरांची अवैध वाहतूक ; चोपडा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आजपासून OTP शिवाय येणार नाही ‘गॅस सिलेंडर’

November 1, 2020

सचिन वाझे हे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय, ते कशासाठी? : मुख्यमंत्री

March 10, 2021

बीएचआर घोटाळा : ९ आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी !

June 18, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ६ कोरोनाबाधित, ७ झाले बरे !

July 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group