धरणगाव (प्रतिनिधी) शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव मागील वर्षाप्रमाणे नुकताच धूमधड़ाक्यात साजरा करण्यात आला.
शहरातील श्रीकृष्ण भक्तांच्या सहकार्याने लाड शाखीय वाणी मंगल कार्यालयात संध्याकाली ५ वाजेपासुन रात्री १० वाजेपर्यंत जंगी आणि भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले. सर्वप्रथम सजवलेल्या श्री राधा कृष्ण प्रतीमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर खास पुण्याहुन आलेले श्रीमान पार्थ सारथी दास प्रभुजी (इस्कॉन) यांनी श्रीकृष्ण कथा सादर केली. तसेच वृंदावनहून आलेले अन्य प्रभुजी आणि त्यांच्या सहकार्यांनी उत्साहपूर्वक वातावर्णात संकीर्तन करून सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
पाचोरा येथील इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष चैतन्य जीवन प्रभुजी यांच्या मार्गदर्शनात भगवान श्रीकृष्णाचा पंचगव्य अभिषेक संपन्न झाला. यात आलेल्या प्रत्येक भक्ताला स्वताच्या हाताने अभिषेक करण्याचा लाभ घेता आला. नंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यात नृत्य,चित्रकला स्पर्धा,भागवत श्लोक पठन झाले. यात बालगोपालांनी राधा,कृष्ण आणि अन्य वेशभूषा साकारून नृत्य करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमानंतर सर्व भक्तांनी महाप्रसादचा आनंद घेतला. कार्यक्रमाच्या सेवेत गणेश ठाकुर परिवार,आनंदराव परिवार,दिनेश पवार परीवार ,महेश सावला परिवार यांच्यासह अनेक सदस्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.