जळगाव (प्रतिनिधी) मदत करण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून ठेवत एटीएम कार्डची अदलाबदली करीत सहाय्यक पशुधन विकास अधिकारी अनिता गणेश पाटील (वय ४६, रा. दादावाडी) यांच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये परस्पर काढून घेतले. ही घटना दि. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोलपंपाजवळ घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पशुसंवर्धन विभागात सहाय्यक पशूधन विकास अधिकारी म्हणून नियुक्ती असलेल्या अनिता पाटील या दादावाडी परिसरात वास्तव्यास आहे. त्याच्याकडे कैलास रमेश बोरसे (वय ४१, रा. मोहाडी, ता. जळगाव) हे कामास आहे. त्यांना कामाची मजूरी देण्यासाठी दि. १४ रोजी सायंकाळी अनिता पाटील यांनी त्यांचे एटीएम कार्ड त्यांच्याजवळ दिले. ते कार्ड घेवून बोरसे हे गुजलाल पेट्रोलपंपजवळील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. पैसे काढत असतांना पहिल्यांदा पैसे निघाले नाहीत, त्यामुळे त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने त्यांना पैसे काढण्यासाठी मदत करीत होता.
काही वेळातच बँक खात्यातून पैसे काढले
थोड्यावेळानंतर अनिता पाटील यांच्या बँक खात्यातून काही मिनिटांच्या आत पाचवेळा ट्रानॉक्शन होवून ५० हजार रुपये कपात झाल्याचा त्यांना मॅसेज आला. त्यामुळे त्यांच्या बँक खात्यातून कोणतरी पैसे काढल्याचे लक्षात येताच, दि. १५ रोजी त्यांनी बँकेत जावून स्टेटमेंट काढले आणि मॅनेजरांना भेटून विचारपूस केली. यावेळी त्यांनी तुमच्या एटीएम कार्डमधून पैसे काढल्याने त्यांनी सांगितले.
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड ब्लॉक केल्यानंतर अनिता पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार एटीएम कार्डची अदलाबदल करुन पैसे काढणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ सानप हे करीत आहे.
















