पुणे (वृत्तसंस्था) पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस आले असता गर्दीतून एका अज्ञाताने देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पर भिरकावल्याची घटना समोर आली आहे. या कार्यक्रमाआधीच भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
याआधी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकमेकांसमोर आल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठीचार्ज केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका कार्यक्रमादरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे.
देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी आल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर गर्दीमधून फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली. मात्र चप्पल फेकणारी व्यक्ती कोण होती हे समोर आलेले नाही. भाजपा कार्यकर्त्यांकडून मोदींचा नारा दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला.