अमळनेर (प्रतिनिधी) आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी जळगाव लोकसभा मतदार संघाची धुरा सांभाळली असून त्यांनी उमेदवार स्मिताताई वाघ यांच्यासोबत महायुतीतील नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी नुकतीच राजवड गावी भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर दीड तास खलबतं खलबतं पार पडली.
उमेदवारी जाहीर झाल्यापासून चाळीसगावचे आमदार आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. उमेदवार तथा माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्यासोबत मतदार संघातील महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील तथा अमळनेरच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता साहेबराव पाटील यांची राजवड गावी भेट घेतली. यावेळी यावेळी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर दीड तास खलबतं खलबतं पार पडली.
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी यावेळी स्मिताताई यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडणूक आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. अमळनेर विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक लीड कसा मिळेल?, यासाठी आजपासूनच प्रयत्न सुरु करणार असल्याची ग्वाही देखील दिली. तर आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील आपले दोन्ही उमेदवार देशात सर्वात मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणत लोकसभेत पाठवायचे असल्याचे सांगीतले. स्मिताताई वाघ यांनी आपल्याला कायमच एक भाऊ म्हणून साहेबराव दादांचे आपल्याला सहकार्य असल्याचे नमूद केले. यावेळी माजी जि.प.सदस्य संदीप पाटील,विक्रांत पाटील, निळंकठ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.