छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) वाळूज परिसरातील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलांची घराबाहेर वाळू घातलेले अंतर्वस्त्र काही दिवसांपासून चोरीला जात होते. त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा कैद झाला. यानंतर त्याला परत चोरीच्या उद्देशाने परिसरात फिरतांना नागरिकांनी या माथेफिरूला चोप देत दामिनी पथकाच्या ताब्यात दिले. सचिन सारंग दिंडोरे (रा. वाळूज परिसर), असे संशयित माथेफिरूचे नाव आहे.
काही दिवसांपासून महिलांची अंतर्वस्त्रे चोरीला जाण्याचा प्रकार होता सुरु !
वाळूज महानगर परिसरात काही दिवसांपासून घराच्या बाल्कनी व आवारात वाळत घातलेली महिलांची अंतर्वस्त्रे चोरीला जाण्याचा प्रकार सुरू होता. लोकलज्जेस्तव या प्रकाराला कुणीही वाचा फोडली नाही. त्यामुळे निर्ढावलेला चोर दिवसाढवळया नागरी वस्तीत शिरून अंतर्वस्त्रे पळवू लागला होता. काही महिलांनी घरातल्या पुरुषांना ही माहिती मदत दिली. परंतू आता या चोरीचा छडा लावायचा तरी कसा? असा प्रश्न त्यांनाही पडला.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात माथेफिरू झाला कैद !
परिसरातील नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता एक तरुण घरासमोर वाळत घातलेली महिलांची अंतरवस्त्रे रात्री-अपरात्री चोरी करताना आढळून आला होता. ही अंतरवस्त्रे घेऊन तो ती परिधान करून अश्लील चाळे करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यानंतर नागरिकांनी या तरुणावर पाळत ठेवली होती. घरांच्या सेफ्टी डोअरसमोर उभे राहून आतले आवाज ऐकायचा. हे करत असताना अश्लील चाळे करतानाही तो सीसीटीव्हीत कैद झाला.
महिलांसह नागरिकांनी दिला ‘पब्लिक मार’ !
शनिवारी दुपारच्या सुमारास सारा वृंदावन सोसायटीसमोर बसलेल्या तरुणांना सीसीटीव्ही फुटेजमधील दिसलेला सदर भुरटा चोर जाताना दिसला. नागरिकांनी त्याला पकडले आणि मग महिला व नागरिकांनीही त्याला ‘पब्लिक मार’ दिला. या प्रकाराची माहिती मिळताच दामिनी पथकाच्या पोलीस नाईक निर्मला निंभोरे, पोलीस कॉन्स्टेबल गिरीजा आंधळे, सोनाली निकम आदींनी नागरिकांच्या तावडीतून विकृत चोराची सुटका करून त्यास ताब्यात घेतले.
आई-वडील लग्न करून देत नसल्याने अंतवस्त्र चोरण्याची दिली कबुली !
चौकशीदरम्यान त्याने आपले नाव सचिन दिंडोरे असल्याचे सांगितले. सिडको, वाळूज महानगरमध्ये राहणारा हा तरुण १८ वर्षांचा आहे. परिसरातल्याच एका हॉटेलमध्ये तो वेटर म्हणून काम करतो. आई-वडील लग्न करून देत नसल्याने महिलाची अंतवस्त्र चोरायचो, अशी कबुली देताच चौकशी अधिकाऱ्यांनीही डोक्याला हात लावला. लग्न लावून देत नसल्याने वासना शमविण्यासाठी या अंतरवस्त्रांचा वापर करत होता. विशेष महत्त्वाचे म्हणजे लोकलज्जेस्तव कुणीही त्याच्याविरोधात फिर्याद द्यायला पुढे यायला तयार नव्हते.