जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना कोठळी येथील खडसेंच्या घरी गेले. याबाबत रंगलेल्या चर्चेतबाबत फडणवीस यांनी स्पष्ट करताना सांगितले की, खासदार रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असून त्यांनी घरी चहासाठी बोलाविले असल्याने खडसेंच्या घरी गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जिल्ह्यात प्रथमच दौरा झाला. मुक्ताईनगर तालुक्यात नुकसानीचा पाहणी दौऱ्यावर असताना फडणवीस हे प्रथम खडसेंच्या घरी गेले. खासदार रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असून त्यांनी घरी चहासाठी बोलाविले असल्याने खडसेंच्या घरी गेल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाबाबत सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे. या विषयी सरकारने आम्हाला चर्चेसाठी बोलाविले तर नक्कीच जाणार आणि पुर्ण सहकार्य राहणार. यात कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. मात्र कोणी राजकारण करत असेल तर त्यास उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.