TheClearNews.Com
Thursday, March 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

समाजाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी दबाब आणायला हवा : डॉ. प्रदीप जोशी

'आयएमए'तर्फे तीन दिवसीय विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचा समावेश

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अलीकडे समाजमाध्यमातून अतिरंजित बातम्या देण्याचा प्रकार खूप घडले. सकारात्मक बातम्या देणे गरजेचे होते पण तसे झाले नाही. सोशल मिडिया माध्यमात कुणीही वाटेल त्या पोस्ट टाकत होते. दुर्दैवाने अनेक सुशिक्षित वर्गाकडून देखील असे प्रकार झाले. समाजाबाबत असलेल्या आपल्या कर्तव्यात आपण कमी पडलो आहे का याचा विचार होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात फार हेळसांड झाली आहे त्यात परीक्षांचा गोंधळ सुरूच आहे. ते दडपण मुलांवरच नाही तर पालकांवर देखील असते. त्याचे परिणाम आयुष्यभर राहणार आहे. भविष्यात आरोग्यसेवा हा सर्वात महत्वाचा विषय होणे गरजेचे आहे. समाजाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत होण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर दबाव आणायला हवा, असे प्रसिद्ध जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांनी सांगितले.

जळगाव आयएमएतर्फे जिल्हावासियांसाठी आयोजित तीन दिवसीय विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प गुंफताना ते ‘कोविडचे कौटुंबिक व सामाजिक परिणाम आणि समस्यांचे निवारण’ या विषयावर बोलत होते. व्याख्यानमालेत आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ.सी.जी.चौधरी आणि सचिव डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. सतिष पाटील, डॉ. दिलीप महाजन हे देखील सहभागी झाले होते.

READ ALSO

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

आयएमएचे अध्यक्ष डॉ.सी.जी.चौधरी यांनी प्रस्तावना करताना सांगितले की, जळगाव आयएमएतर्फे आयोजित या व्याख्यानमालेत गेल्या दोन दिवसात उत्तम मार्गदर्शन करण्यात आले. अनेकांच्या मनातील भिती त्यामुळे दूर झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

आयएमएचे सचिव डॉ. राधेश्याम चौधरी म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रातील विविध शंकांवर कोरोनामुळे होणाऱ्या परिणामांची चिकित्सा करणाऱ्या मार्गदर्शनपर सत्रांचे आयएमएतर्फे लवकरच आयोजन करण्यात येईल. समाजाच्या रक्षणासाठी कालानुरूप पाऊले उचलण्यात येतील असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

मुख्य वक्ते डॉ. प्रदीप जोशी यांनी तिसरे पुष्प गुंफतांना सांगितले की, कोरोनाचे हे वैश्विक महासंकट आहे. संकटात समाजातील बंध विस्कळीत झाले म्हणून समस्या निर्माण झाल्या. प्रत्येक महासंकटाचे ४ टप्पे असतात. समाज एखादे महासंकट आले की समाज विस्कळीत होतो. महासंकट टप्प्याटप्प्याने येते. पहिल्या टप्प्यात आपण गाफील राहतो आणि संकटकडे गांभीर्याने पाहत नाही. कोरोनाबाबत आपल्याला चीन, कोरियाच्या माध्यमातून कळले. आपल्याकडे ऊन खूप असते कोरोना येणार नाही असे आपल्याला वाटले परंतु तो काळ आपल्यासाठी संकेत होते. दुसरा टप्पा म्हणजे आपल्याला कोरोनाचे गांभीर्य कळले नाही मात्र काही लोक याबाबत गंभीर होते इतरांनी मात्र ते हसण्यावारी घेतले. महासंकट आले तेव्हा आपण गांगरून गेलो. आपण गांगरून जातो, चिंता निर्माण होते काहीसा आत्मविश्वास डगमगतो. काही लोक घाबरले तर काही जण निष्काळजी झाले. तिसरा टप्प्यात शासकीय व सामाजिक मदतीमुळे आपण आश्वस्त झालो. चौथ्या टप्प्यात आपल्या अपेक्षा वाढतात त्यामुळे आपण यंत्रणेतील त्रुटी आणि चुका काढतो, असे डॉ. प्रदीप जोशी म्हणाले.

सर्व टप्प्यातून जात असताना आपल्यासह कुटुंबावर परिणाम होत असल्याचे लक्षात आले. कुटुंबातील जेष्ठांमधील एकाकीपण वाढले. लॉकडाऊनमुळे झालेल्या अतिसहवासामुळे कुटुंबात खटके उडण्याचे प्रमाण वाढले. पहिल्या लॉकडाऊनमध्ये सर्वांनी कुटुंबासह आनंद घेतला. सर्व फार फार महिनाभर चालले त्यानंतर एकमेकांच्या संबंधावर आणि कुटुंबावर त्याचे परिणाम होऊ लागले. कालांतराने नैराश्य आणि व्यसनाधीनता वाढली. आकडेवारी सांगते की, लॉकडाऊनमध्ये कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार वाढले. कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात घट झाली त्यामुळे जीवनशैली टिकवणे कठीण झाले. मनस्वास्थ खराब होऊ लागले. सुरुवातीला कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचे प्रकार घडले परिणामी नागरिकांच्या मनस्वास्थावर परिणाम होऊ लागला. समाजावर असे संकट आले तेव्हा एकमेकांवर दोष देत राहिले. त्यामुळे समाजाची एकसंघता भंग झाली. हे केवळ भारतात झाले नाही तर जगभर झाले. समाजातील बरेच घटक अद्यापही बेजबाबदारपणे वागत आहे. नेतृत्वात आपण कमी पडतोय की काय याचा विचार करणे गरजेचे आहे. एकत्र कुटुंबामुळे एकमेकांना मानसिक आधार मिळण्यास मदत झाली. कुटुंबप्रामुख्याने खरे काय याची माहिती कुटुंबियांना देणे आवश्यक आहे. प्रत्येकाला आपली जागा आणि वेळ द्या. सतत नातेवाईकांना वेळ द्या. हे संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे ठरवायला हवे, असे डॉ. प्रदीप जोशी यांनी सांगितले.

जळगाव आयएमएतर्फे आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेचा समारोप डॉ. प्रदीप जोशी यांनी सुनील पवार यांच्या समय रूक गया हैं, हम नही। हौसला बुलंद है, कमी नही। या कवितेने केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
Next Post

शरद पवार शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

योगींना गोरखपूरमध्ये मिळणार कडवं आव्हान ; भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद मैदानात

January 21, 2022

जयश्रीताईंच्या परिवर्तनाच्या लाटेत विरोधक भुईसपाट होतीलच; कार्यकर्त्यांच्या विश्वास…!

November 15, 2024

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशिभविष्य 14 ऑक्टोबर 2025 !

October 14, 2025

महाराष्ट्र चर्मकार महासंघातर्फे गठई कामगार स्टॉल

October 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group