चोपडा (प्रतिनिधी) मराठा समाजात निराधारांना, वंचितांना, उपेक्षितांना मदतीचा हात देऊन त्याच्या जीवनात पुनश्च आनंदाचे रंग भरून आपले आयुष्य सार्थक बनविणाऱ्या भास्करराव नाना पाटील यांच्या निःस्वार्थ भावनेने केलेल्या सेवेचा आदर्श समाजाने घ्यावा, असे गौरवद्वार नगरविकास मंत्रालयाचे अप्पर सचिव प्रतिभा पाटील यांनी केले.
राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार प्राप्त भास्करराव नाना पाटील (जानवेकर) ह.मु.चोपडा यांचे कार्य पाहून प्रतिभा पाटील यांनी त्यांचे मंत्रालयात सत्कार नुकताच करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या अधीक्षकपदावरून निवृत्त झाल्यानतंर समाजसाठी काही तरी वेगळे करावे असा निश्चय मनाशी बांधून समाज कार्याला सुरवात केली. त्यात त्यांना मराठा समाजात पुनर्विवाह पध्दत सुरू करू असे निश्चित केले आणि त्यांनी सोशल मिडियावर व्हाट्सअँप मराठा समाज पुनर्विवाह असा ग्रुप स्थापन केला. या ग्रुपच्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण करण्याचे काम सुरू केले. अल्प वेळेत विधवा, अल्प काळात फारकत, पती-पत्नी मध्ये सामंजस्य नसणे यावरून पत्नीला सोडून देने अशा मुली समाजात बसून राहत असल्याने त्यांचे पुनर्विवाह करून देणे त्याच पद्धतीने मुलांना देखील मुली न मिळण्याचा त्रास होत होता तो त्रास या माध्यमातून कमी करण्यासाठी भास्करराव नाना पाटील हे करत आहेत. त्यांना त्यांच्या धर्मपत्नि शकुंतलाबाई पाटील हे सहकार्य करीत आहे आणि पीडितांच्या जीवनात पुनश्च आनंदाचे सप्तरंग भरून देत आहेत. भास्करराव नाना पाटील हे सर्व कार्य निशुल्क करीत असतात. उलट त्यांचा स्वतः चे पदरचे पैसे मोड करून विवाह जमवून देतात त्यांना या कार्यात सहकार्य चोपडा येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे संचालक डॉ.बी.आर. पाटील,(घोडगावकर), हे करीत आहे बी.एन.पाटील, गोरगावले येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.व्हि. पाटील, राजेन्द्र पाटील (शिरपूर), यांचे देखील सहकार्य मिळत आहे. या कार्यातून त्यांनी आज पर्यंत २५ ते ३० लग्न जमवून दिले आहेत आणि ते आंनदनाने संसार करत आहेत. या कार्यबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मंत्रालयात सत्कार करण्यात आल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.