धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रोटवद येथील मूळ रहिवासी आणि गुजरातमधील अहमदाबाद येथे सैन्य दलात कर्तव्य बजावत असलेले जवान विनोद जवरीलाल पाटील (वय ३९) हे शनिवारी पहाटे ४ वाजता हृदयविकार व ब्रेन हॅमरेजने सुरेंद्रनगर गुजरात येथे निधन झाले. ही वार्ता रोटवदला पोहोचताच रोटवदसह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली.
धरणगाव तालुक्यातील रोटवद येथील रहिवासी शहीद विनोद जवरीलाल पाटील हे गेल्या ११ वर्षापासून ते सैनिक दलामध्ये कार्यरत होते. ते सध्या गुजरात राज्यातील अहमदाबाद सैनिक दलाच्या कॅम्पमध्ये नवीन भरती झालेल्या जवानांना प्रशिक्षण देण्याचे काम करत होते. १७ नोव्हेंबररोजी जवानांना प्रशिक्षण देण्याचे कर्तव्य बजावताना टेबलावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. लागलीच त्यांना सैन्य दलातील रुग्णालयात दाखल केले होते.
१८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान ते शहीद झाले. त्यांची अंत्ययात्रा १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता रोटवद येथून निघणार असून त्यांच्या शासकीय इतमातात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, जवान विनोद शिंदे यांच्या पार्थिवावर उद्या (रविवार) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. याबाबत प्रशासनातर्फे तयारी करण्यात येत आहे. तर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून शोकसंदेश व्यक्त केल्या आहेत.












