चोपडा (प्रतिनिधी) शहरातील साई बाबा कॉलनीतील रहिवासी असलेले बीएसएफ जवान अरुण दिलीप बडगुजर (वय ४२) यांचा त्रिपुरातील बांगलादेश सीमेवरील आगारतळा येथे दहशतवाद्यांशी सामना करत असताना वीर मरण आले. त्यांची शहिद झाल्याची घटना घडल्याचे वृत्त येताच चोपड्यात शोककळा पसरली आहे.
गेल्या २० वर्षांपासून १०५ बीएसएफ बटालियन (सीटी/जिडी) मधून आणले देशसेवा पूर्ण करून अरुण बडगुजर हे ४ महिन्यांनी सेवापूर्ती करून घरी परतणार होते. अशातच त्यांना ९ रोजी दुपारच्या सुमारास त्रिपुरा सीमेवरील आगरताळा येथे झालेल्या गोळीबारामध्ये वीर मरण आले. या घटनेबाबत डीवायएसपी कुणाल सोनवणे यांनी दुजारा दिला असून ११ रोजी त्यांचे पार्थिव विमानाने इंदोर येथे येईल. तेथून त्यांचे पार्थिव चोपडा येथील घरी जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.