जळगाव (प्रतिनिधी) सीबीआयमधून बोलतोय, तुम्ही एका गुन्ह्यात अडकलेले असून तुम्हाला ३ वर्षाची शिक्षा होईल, अशी धमकी देत चाळीसगावातील एका महिलेकडून साडेआठ लाख उकळल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात सुनील कुमार आणि अनिल यादव नामक अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ११ जून ते दि.१२ जून २०२४ रोजीपर्यंत मो.क्र. ९६९१८३६७५५, ८९६७७६९६४३ सुनिल कुमार व अनिल यादव CBI अधिकारी नाव सांगणाऱ्या व्यक्तीने चाळीसगाव शहरातील ४२ वर्षीय सीमा (नाव बदलेले) ह्यांना फोनवरून धमकी की, तुम्ही एका गुन्हयात अडकले असून केस मिटवावी लागेल असं सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर सदर केस मिटवली नाही तर तुम्हाला ३ वर्षे शिक्षा होईल, अशी धमकी देत संबंधित महिलेकडून खंडणीच्या स्वरुपात वेळोवेळी ऑनलाईन RTGS द्वारे तब्बल साडेआठ लाख रुपये स्विकारले. या प्रकरणी मोबाइल क्रमांक ९६९१८३६७ ५५ आणि ८९६७७६९६ ४३ नंबर धारक सुनिल कुमार व अनिल यादव नामक व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. दत्तात्रय निकम हे करीत आहेत.