TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सातपुड्यातील गावांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गावांसाठी जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुढाकाराने विशेष आरोग्य शिबीरासह आदिवासी विकास विभागाच्या योजना, त्यांचे संरक्षण आणि कायदे, आपात्कालीन कार्य, वन्यजीव जनजागृती, कोरोना विषयक जनजागृती व लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

रावेर आणि यावल तालुक्यातील गारखेडा, उसमळी, जामन्या, गाडऱ्या आणि लंगडाआंबा या भागातील आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिराचे आयोजन बुधवारी सातपुडा विकास मंडळ, पाल संचलित जामन्या येथील आश्रमशाळेत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. ए. शेख हे होते. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, अँड. सागर चित्रे, विजय दर्जी, शरद न्हायदे, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश पाटील, नायब तहसीलदार आर. डी. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

कार्यक्रमाच्या सुरूवातीस बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यांनतर गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कामकाजाविषयी व कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी सविस्तर माहिती दिली. जंगलात सर्पदंश झाल्यास करावयाचा आपात्कालीन प्रथमोपचार या विषयावर सर्पमित्र जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, गौरव शिंदे, कल्पेश तायडे यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य विषयक योजनांची माहिती ग्रामीण रूग्णालय, पालचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांनी दिली.

या शिबिरात जिल्हाधिकारी अभिजित राउत व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. बारेला यांनी स्थानिक पावरा भाषेत नागरिकांना मार्गदर्शन करून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन या गावातील अनेक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. या गावांमध्ये अगोदर आदिवासी बांधव लस घेण्यास तयार नव्हते, त्याच गावातील नागरिकांनी यावेळी याठिकाणी लस घेतली हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरल्याचे डाॅ. बारेला यांनी सांगितले. या नागरिकांना मुख्य अधिपरिचरिका सौ. कल्पना नगरे व परिचारिका शाबजान तडवी यांनी लस दिली.

कार्यक्रमास जामन्याचे पोलीस पाटील, सत्तरसिंग बारेला, सरपंच काशिनाथ बारेला, माजी सरपंच भरत बारेला, प्रताप बारेला, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष व मानद सचिव रवींद्र फालक, अधीक्षक रविद्र ठाकूर. वनपाल ललित सोनार, लालसिंग बारेला, तेरसिंग बारेला, भरत बारेला, दारासिंग बारेला, बिर्ला बारेला, देवसिंग बारेला आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक रमेश साबळे, प्राथमिक मुख्याध्यापिका हेमलता सावकारे, एम. डी. नरवाडे, प्रवीण चव्हाण, एस.पी. नामायते, अधीक्षक सुभाष गाढे, एन. व्ही. ढाके, अनिल तडवी, राजेंद्र कांचोळे, मामाज पवार, राजेंद्र पाटील, गीरासिंग बारेला,, गणेश प्रजापती, कस्तुरा बारेला, निलेश बारेला, वीरेंद्र बारेला, जमेला तडवी, विठ्ठल मेढे यांनी घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार बाळकृष्ण देवरे यांनी मानले.

आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉ. बी. बी. बारेला, डॉ. सचिन पाटील, डॉ. भोईटे, डॉ. ठाकरे, मुख्य अधिपरिचारिका सौ. कल्पना नगरे, अधिपारीचारक अरिहंत पाटील, औषध निर्माता पी. एम. पाटील, परिचारिका राबजान तडवी, गोविंद पवार यांच्यासह ग्रामीण रुग्णालय. पाल व प्राथमिक आरोग्य केंद्र. सावखेडा ता. यावल येथील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती डॉ. बारेला यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लातुरात भरदिवसा कोयत्याने गळा चिरून खून ; मावसभावानेच केले सपासप वार !

October 18, 2024

न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे धोकादायक : देवेंद्र फडणवीस

November 13, 2021

नवीन बियर बार व परमिटचा परवानासाठी अप्रत्यक्ष पैशाची मागणी ; राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांचा आरोप

March 14, 2021

जळगावातून बंगाली कारागीरने लांबविले १७ लाखांचे सोने !

March 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group