चोपडा (प्रतिनिधी) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाढलेल्या महागाई थोपविण्यासाठी केंद्र शासनाने सर्वसामान्यांसाठी प्रति किलो ६० रूपये दराने हरभरा डाळ विक्रीस नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे.
दि. १९ रोजी सकाळी स्टॉल्स लावून गायत्री ट्रेडर्सतर्फे डाळ विक्री करण्यात आली. विक्रीचा स्टॉल्स सुरू झाल्यानंतर एक ते दीड तासाच्या आतच जवळपास ७० किलो डाळ विक्री करण्यात आली. भारत डाळ योजने अंतर्गत ही डाळ विक्री करण्यात आली. डाळ घेण्यास येणाऱ्यास आधार कार्डवरील नंबर सांगणे आवश्यक असल्याने ज्या ग्राहकाला आधार कार्ड नंबर सांगता येईल त्यांनाच डाळ दिली जात आहे. अन्यथा आधार कार्ड सोबत घेवून जाणे आवश्यक आहे.
गायत्री ट्रेडर्स मार्फत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे ही भारत चना डाळ योजनेअंतर्गत विक्री सुरू आहे. चना डाळ विक्री स्टॉल्स वर लावण्यात आलेल्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि जिल्ह्यातील तीनही मंत्री गिरीश महाजन,गुलाबराव पाटील,अनिल पाटील आणि आमदार लताताई सोनवणे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. या केंद्रावर सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्या मार्फत ही विक्री सुरू झाली आहे.यामुळे खुल्या बाजारात चना डाळ ७५ रू प्रति किलो दराने विक्री करण्यात येत आहे.मात्र या केंद्रावर महागाई स चाप बसवा म्हणून ६० रू प्रति किलो दराने विक्री करण्यात येत आहे.