रावेर (प्रतिनिधी) खंडवा-बऱ्हाण आणि रावेरहून प्रवासी रेल्वे गाड्या लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रवासी मित्र प्रशांत बोरकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे रेल्वे सुविधा मागणीस काही अंशी यश आले असून महाराष्ट्र राज्य तीन गाड्या सुरू केल्या पण पॅसेंजर गाड्या बंद करून एक्स्प्रेस गाड्या सुरू आहे. खंडवा-बऱ्हाणपूर आणि रावेरहून पुणे, मुंबई अमरावती, नंदुरबार, सुरतसाठी रेल्वे प्रवासी सवारी गाड्या सुरू करण्याची मागणी सातत्याने राष्ट्रीय जनता दलाचे तसेच रेल्वे प्रवासी मित्र ग्रुपतर्फे केली जात आहे. भुसावळहून गाड्या सुरू केल्या जातात आणि खंडवा बऱ्हाणपूर, रावेर या शहर भागाकडे मुद्दाहून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
खंडवा-बऱ्हाणपूरहून मुंबई, पुणे, कोल्हापूरसाठी फास्ट सवारी गाडी सुरू करा. जळगाव, नंदुरबार, अकोला, शेगाव-शिर्डीसाठी मेमु ट्रेन सुरू करावी. रावेर येथे महानगरी एक्स्प्रेस, पुणे दानापूर, शिर्डी, सचखंड आणि नांदेड एक्स्प्रेस गाड्या थांबण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री खासदार आणि रेल्वे समिती यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी देखील प्रशांत बोरकर यांनी केली आहे. नवीन रेल्वे प्रवासी गाड्या सुरू करताना खंडवा-बऱ्हाणपूर, रावेर या शहराचा विचार केला पाहिजे, नाहीतर आगामी काळात निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल किंवा प्रवासी आपले उमेदवार उभे करतील,असा अशा इशारा देखील श्री. बोरकर यांनी दिला आहे.