मुंबई (वृत्तसंस्था) ज्या आमदारांना मुंबईत घर नाही. जे आमदार मुंबईचे नाहीत त्या आमदारांना मुंबईमध्ये घर मिळणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. आमदारांसाठी 300 घरं बांधणार आहे. सगळ्याच पक्षाच्या आमदारांना घरं आवश्यक आहेत. राज्यातील आमदारांना कायमची घरं देणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
आमदारांसाठी म्हाडा गोरेगावमध्ये घरे बांधणार आहे. राज्यातील आमदारांनाही घरे मिळणार आहेत. आमदारांसाठी 300 घरं बांधणार आहे. सगळ्याच पक्षाच्या आमदारांना घरं आवश्यक आहेत. राज्यातील आमदारांना कायमची घरं देणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सभगृहात महाविकास आघाडी सरकारचं अभिनंदन केले. आजोबा नारळाचे झाडं लावतात, पण त्याचं फळ कोण खातात हा संशोधनाचा विषय आहे. मुंबईचा एवढा गांभीर्याने विचार केला पण त्याचा फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून केला, असा टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्वसामान्यांना घरं, तसेच आमदारांना घरं देण्याची घोषणा केलीये. आमच्या सरकारने मुंबईचा विचार केला याचा मला अभिमान वाटतो. मला शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून अभिमान वाटत असल्याचं उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले.