जळगाव (प्रतिनिधी) हॉकी महाराष्ट्राच्यावतीने जूनियर मुलांची व वरिष्ठ महिला गटातील राष्ट्रीय हॉकी निवड चाचणीचे आयोजन बालेवाड़ी (पुणे) येथे दि. १४ व १७ सप्टेंबर रोजी होणार असून सदर निवड चाचणीतुन निवळलेला संघ हा राष्ट्रीय जूनियर पुरुष व वरिष्ठ महिला हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र राज्यांचे प्रतिनिधित्व करेल. या करिता जळगाव जिल्ह्याची जूनियर मुलांची व महिलांची निवड चाचणी दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीड़ा संकुल येथे घेण्यात येईल.
ज्युनिअर खेळाडूंची जन्म तारीख १ जानेवारी २००२ नंतर ची असावी व जन्म तारखेचे प्रमाण पत्र सोबत आणावे. तसेच खेळाडुंनी आपल्या किट सहित सदर निवड चाचणी करिता हजर राहवे, असे आव्हान हॉकी जळगावचे सचिव फारूक शेख यानी एका पत्रकाद्वारे केले आहे.