चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील धानोरा, निमगव्हाण, गलंगी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गड्डे पडले असून दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. याच अनुंषागाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सार्वजनीक बांधकाम विभागाला तात्काळ रस्ते दुरुस्तीबाबत आज निवेदन देण्यात आले.
निवेदनात रस्ते दुरूस्ती लवकरात लवकर न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील,युवक तालुका अध्यक्ष मनोज पाटील,युवक तालुका प्रसिद्धी प्रमुख संदीप कोळी,सतिश पाटील आदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.