भुसावळ (प्रतिनिधी) येथील भुसावळ रोडवरील छत्री चौफुलीपासून पिंपरूड फाटापर्यंतच्या रस्त्यावरील डांबरीकरण रस्ता अत्यंत खराब झालेला असून हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी आ. शिरीष चौधरी यांना येथील नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळेसह आदी कार्यकर्त्यांनी खिरोदा येथे जाऊन निवेदन दिले.
आ. चौधरी यांनी तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन त्यांना दिले. गेल्या ३ वर्षांपासून फैजपूर येथील भुसावळ रोडवरील छत्री चौफुली पासून पिंपरूड फाटा पर्यंतच्या रस्त्यावरिल डांबरीकरण रस्ता अत्यंत खराब झालेला असून या संपूर्ण दोन कि.मी. रस्त्यावर खड्ड्यात खड्डे खूप झालेले आहेत. तसेच रस्त्यावरून जाणे येणे कठीण होऊन दुचाकी,चार चाकी तसेच अवजड वाहनांची वाहतूक करणे अत्यंत कठीण झाले आहे. यात छोटे-मोठे अपघात होऊन दुचाकी, चार चाकी गाड्यांचे अतोनात नुकसान होत आहे, यासाठी बऱ्याच वेळा नागरिकांना मधुकर कारखाना मार्गे भुसावळ जावे लागत आहे. परंतु विरोदा, वढोदा, पिंपरूड, करंजी या गावांना जाणाऱ्यांना याचा प्रामुख्याने त्रास सहन करावा लागत आहे.
दुचाकी, चार चाकी गाड्यांचे अतोनात नुकसान होत आहे, तरी तात्काळ भुसावळ रास्ता दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी फैजपूर येथील नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, गटनेते कलीम मण्यार, मनोहर नेमाडे, काँग्रेस शहराध्यक्ष शे. रियाज, मनोज पाटील, शेतकरी राजेश चौधरी, आदीं नागरीकांनी आ. शिरीषदादा चौधरी यांना खिरोदा येथे जाऊन निवेदन दिले आहे. त्यावर आ. चौधरी यांनी तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले असल्याचे नगरसेवक केतन किरंगे व देवेंद्र बेंडाळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.