जळगाव (प्रतिनिधी) शहर महानगरपालीका ९ कोटी रुपये खर्च करून शहरातील खड्डे बुजविणार असल्याच्या बातमीच्या पार्शवभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदन देत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच घंटागाडीवर भोजपुरी गाणे ऐकविणे बंद करावे अन्यथा मनसे ‘गाड्यांवरील भोंगे काढो’ आंदोलन करेल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
१) संपुर्ण शहरात अमृत योजनेचे काम सुरू आहे. पाईपलाईनचे काम अनेक ठिकाणी रखडले आहे ते पुर्ण होणार नसेल तर तेथीलही खड्डे बुजविले जाणार आहेत का..? तसेच खड्डे बुर्जवितांना कोणते निकष लावले जातील ( उदा. विशेष – अतिविशेष नागरीक, उद्योगपती, नगरसेवक, नगरसेविका यांच्या घराच्या आसपास वगैरे) अथवा सरसकट खड्डे बुरजविले जातील याची माहिती जाहीर करावी. २) संपुर्ण १९ प्रभागात जे ठेकेदार काम करणार आहेत त्या भागात ठेकेदाराचे नांव, मोबाईल नं. व सदर काम किती किमतीचे आहे तसेच डिफेक्ट लायबिलीटी पिरीयड ( मा. उच्च न्यायालयाच्या निर्बधानुसार ) याची सविस्तर माहितीचा फलक लावण्यात यावा जेणेकरून परीसरातील जनतेला कामाबाबत काही तक्रार असल्यास माहिती देणे-घेणे सोयीस्कर होईल.
घंटागाडीवरील भोजपुरी गाणे बंद करावे – महोदय रोज सकाळी घंटागाडी संपुर्ण शहरात फिरतात मात्र या गाड्यांवर भोजपुरी हिंदी गाणे वाजवले जातात ते तातडीने बंद करण्यात यावे. महाराष्ट्रात कायदेशिर मराठी भाषा आहे. मराठी भाषेचा गर्व महानगरपालीका प्रशासनाला हवा. मात्र भोजपुरी गाणे वाजवुन महानगरपालीका प्रशासन मराठी भाषेचा अपमान करीत आहे, अशी आमची धारणा आहे. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा व भोजपुरी गाणे ऐकविणे बंद करावे अन्यथा मनसे “गाड्यांवरील भोंगे काढो” आंदोलन करेल. रील तिन्ही सुचनांच्या बाबत आपण गांभीर्याने विचार करावा व महापालीका प्रशासनाला याबाबत अवगत करून आदेश द्यावे, अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करीत आहोत. या निवेदनावर अॅड. जयप्रकाश बाविस्कर, अॅड. जमील देशपांडे, विरेश पाटील, कल्पेश खैरनार,मुकुंदा रोटे,रझाक शेख,संदीप पाटील,संदीप मांडोळे,विशाल सोनार,योगेश पाटील,आझम शेख,राजेंद्र निकम, इमाम पिंजारी आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.