भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून तात्काळ नळ पाइपलाईन बसविण्यात यावी यांसह विविध तक्रारीबाबत काँग्रेस सेवा फाउंडेशनचे शहराध्यक्षा मीनाक्षी जावरे यांनी तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायत सरपंचांना निवेदन दिले आहे.
साकेगाव शिवारातील लाईफ केअर हॉस्पिटल समोरील वरदविनायक कॉलनी, महालक्ष्मी नगर, स्वामी विहार, भाग्यश्री विहार, साई विहार, स्वामीनारायण या सर्व कॉलोनीमध्ये रस्त्याचे प्रॉपर काम व्हावे म्हणजे काँक्रीटीकरण आणि अमृत योजनेचा लाभ व्हावा तसेच नाल्यांची सफाई १५ वर्षात एकही वेळा झालेली नाही. घंडागाडी देखील नियमित यावी, कारण न दाखवता गाडी येणे गरजेचे आहे. घंडागाडी येत नसल्यामुळे नागरिक जिथे राहतात त्याच ठिकाणी घाणीचे सम्राज्य निर्माण होत आहे. रस्त्यावर लाईट नाहीत तसेच मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांची सरपंचांनी दाखल घ्यावी. सरपंचांनी लवकरात लवकर दखल न घेतल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा भुसावळ शहराअध्यक्षा मीनाक्षी जावरे यांनी दिला आहे.
















