भुसावळ (प्रतिनिधी) भु.औ.विद्युत केंद्र दीपनगर येथे दि. 03 फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेची फेर चौकशी व्हावी व निरापराध व्यक्तींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निळे निशाण सामाजिक संघटना म. राज्य यांच्यावतीने जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनास निवेदनाव्दारे केली आहे.
दि. 03-02-2020 रोजी भु.औ. विद्युत केंद्र दीपनगर 210 M.W. च्या गेट समोर रात्री 11:30च्या सुमारास ”संजय बळीराम बऱ्हाटे, व गेट वर ऑन ड्युटी असणारे सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये काही कारणास्तव , वाद झाला असता, व नंतर संजय बऱ्हाटे मयत पावले,, अशी माहिती पोलीस प्रशासनाला दिली गेली हे सत्य असून या घटनेत काही निरापराध व्यक्तींनवर पण भा.दं.वि कलम 302 सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे. प्रथम खबरी अहवालात,,नमूद असलेल्या काही बाबी, अर्धसत्य दाखवून, व पोलीस प्रशासनावर एक भावनिक दृष्टीने दडपन आणून पोलीस प्रशासनाची दिशाभूल केली असून या घटनेमध्ये काही निरापराध,व सुशिक्षित, व्यक्तींना अडकवण्याचा प्रयत्न केला, गेला आहे.
ही घटना निंदनीय असून याच दुःख सर्वांनाच आहे, पोलीस प्रशासनाने या घटने मध्ये असलेल्या दोषी वर योग्य ती कारवाई करावी, परंतु भा.द.वि.कलम 302 सारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात, काही निरापराध व्यक्तींचे आयुष्य उध्वस्त होऊ नये, म्हणून दीपनगर येथे 03-02-2020 रोजी घडलेल्या घटनेत पोलीस प्रशासनाने विशेष अधिकारी यांची नेमणूक करून या घटनेची फेर चौकशी व्हावी अशी मागणी ”निळे निशाण सामाजिक संघटने च्या वतीने निवेदना च्या स्वरूपात,जळगाव जिल्हा S.P,, प्रवीण मुंढे,, भुसावळ ता. D.Y.S.P वाघचौरे व पोलीस प्रशासना कडे केली.
निवेदन देतांना, निळे निशाण सामाजिक संघटना,म. राज्य संस्थापक, आनंद भाऊ बाविस्कर, भु शहर अध्यक्ष, महेंद्र महाले,सुखदेव सोनवणे ,संतोष गुप्ता, भु. ऊ अध्यक्ष, आकाश सपकाळे,,,युनूस शेख, दीपक लोहार,रवींद्र बाविस्कर व इतर पदाधिकारी उपस्थित होते