पाचोरा (प्रतिनिधी) विधानसभेच्या विजयी मिरवणुकीतून घरी परतताना डीजेची 5 तोडफोड, कार्यकर्त्यांवर दगडफेक न करत जातीवाचक शिविगाळ केल्याची घटना पाचोरा शहरातील शिवाजी नगर भागात घडली. या प्रकरणी तब्बल ३९ जणांविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात 5 गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पाचोरा विधानसभा निवडणुकीचा न निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहिर न झाला. यात महायुतीचे उमेदवार आ. किशोर पाटील हे विजयी झाल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डि. जे. लावून जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान, विजयी मिरवणूक संपल्यानंतर नागसेन नगरसह परिसरातील पुरुष व महिला कार्यकर्ते घरी परतत असताना शिवाजी नगर येथे ३० ते ४० जणांच्या टोळक्याने डि.जे.च्या काचा फोडुन, दगडफेक करत विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना जातीवाचक शिविगाळ केली. तर दगडफेकीत जयेश शंकर तायडे यांचे उजव्या हाताचे बोट फॅक्कर झाले आहे. तसेच किशोर शंकर दाभाडे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून यासोबतच अनुराग मांगो खेडकर हाताला दगड लागल्याने ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी जयेश शंकर तायडे यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात ३९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे करत आहेत.
पाचोरा शहरातील शिवाजी नगर भागातील महिला घराबाहेर गप्पा मारत बसलेल्या असताना त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत शिवाविगाळ, धमकी देणाऱ्या २४ जणांविरूध्द पाचोरा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजी नगर भागातील अश्विनी समाधान बावचे यांनी पाचोरा पोलिसांत २४ जणांविरूध्द गुन्हा नोंदवला आहे. यात नमुद केले आहे की, २३ नोहेंबर रोजी काही तरून डीजे लावून शिवाजी नगरकडून बस स्टॅण्डकडे नाचत जात होते. या वेळी काहि महिला घराबाहेर गप्पा मारत होत्या. या मिरवणुकीतिल काहि तरूणांनी महिलांना पाहुन आंगावरील कपडे काढुन अश्लिल हावभाव करत नृत्य केले. तसेच त्यांनी महिलांचा हात धरून डी. जे. समोर ओढुन आणले. तसेच मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. तसेच शिवीगाळ करुन धमकी दिल्याची त्यांनी तक्रार दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करत आहेत.