मुक्ताईनगर (प्रतिनिधी) चेकपोस्ट वरुन होणारी अवैध व ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यात करा, अशी मागणी मनसेनी केली असून यासंदर्भातील निवेदन मा.आर.टी.ओ. अधिकाऱ्याला देण्यात आले आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सदर चेकपोस्ट वरुन दररोज हजारो ओव्हरलोड ट्रक महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे अपधाते रस्ते खराब होणे, शासनाचा महसूल बुडणे अशा अनेक तक्रारी आहेत. चेकपोस्ट वरुन चिरीमिरी देवून ओव्हरलोड वाहतुकीचे ट्रक सोडले जातात. असे निदर्शनास आले आहे. सात दिवसात ओव्हरलोड ट्रक चाहतूक बंद न केल्यास मनसे चेकपोस्ट वर येवून वाहनाचे तोलकाटा करणे, तसेच ओव्हरलोड ट्रक यांना कायदेशीर दंड द्यायला भाग पाडून प्रचंड आंदोलन करेल, असे आवाहन याद्वारे करण्यात आले आहे.
याप्रसंगी उपजिल्हाध्यक्ष राहुल काळे, तालुका अध्यक्ष मधुकर भोई, तालुका सचिव अतुल जावरे, श्रीराम् भोई, मंगेश कोळी, मुकेश झालटे, यश पाटील, गजू पाटील, पंकज बोर्डे, दुर्गेश देशमुख, अक्षय पाटील, आयुष्य सोनार, धीरज पाटील, तेजस पाटील, मनीष खर्चे, अक्षय देशमुख, तन्मय पाटील, सागर पाटील, अश्विन निंबाळकर, राहुल, अक्षय हारगडे, भूषण हारगडे, हर्षल भिका पाटील, सौरव सायखेडे, सचिन पाटील आदी उपस्थित होते.