वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) आयुष्यात एक वेळा जरी विषारी सापाने चावा घेतला तरी व्यक्तीच्या जगण्याची शास्वती देता येत नाही. मात्र, वॉशिंग्टन येथील एका सर्प संशोधकास तब्बल १७३ वेळा विषारी सापाने चावा घेतलेला असताना ही, उलट तो १०० वर्षे जगला. यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सर्प संशोधकाचे नाव बिल हायस्ट असे असून, त्यांना स्नेकमॅन म्हणून ही ओळखलं जात होत.
१९१० मध्ये जन्मलेल्या बिलला वयाच्या सातव्या वर्षापासूनच सापांमध्ये रस होता. वयाच्या बाराव्या वर्षी त्याला एक विषारी साप चावला होता. १९२९ मध्ये तो अमेरिकन वर्ल्ड एअरवेजशी जोडला गेला. त्यानंतर तो देशविदेशात फिरायचा. तेव्हा दुसऱ्या देशातील साप तो अमेरिकेत आणायचा. १९४६ मध्ये त्याने पहिल्यांदाच कोब्रा आणला. त्यानंतर त्याने मियामी सर्पेंटेरियमची स्थापना केली. एका रिपोर्टनुसार, बिलकडे १० हजारपेक्षा अधिक साप होते. यामध्ये समुद्री साप, आफ्रिन ट्री स्नेक, कोब्रा, रॅटल स्नेक अशा कितीतरी विषारी सापांचा समावेश होता. या सापांचं विष काढून तो संशोधनासाठी पाठवत असे. बिल सापांना पकडायचा आणि त्याचं विष काढून औषध बनवण्यासाठी संशोधकांना द्यायचा, यामुळे किती तरी लोकांचा जीव वाचवण्यात त्याने मदत केली आहे.
या सापांपासून तो स्वतःला दंश करून घेत असे जेणेकरून त्याच्या शरीरात विषाविरोधात प्रतिकारक शक्ती तयार होईल. २००८ सालापर्यंत त्यांनी स्वतःला १७३ विषारी सापांकडून दंश करून घेतला. २० वेळा त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्याचा जीव जाता जाता राहिला. शरीरात इम्युनिटी निर्माण करण्यासाठी तो Mithridatismपद्धतीची वापर करायचा. यामध्ये एखाद्या व्यक्तीला मर्यादित स्वरूपात वेळोवेळ विष दिलं जायचं. यामुळे त्याचा मृत्यू होत नाही तर त्याच्या शरीरात सापाच्या विषाविरोधात अँटिबॉडी तयार होते. इतक्या विषारी सापांनी चावल्यानंतरही तो शंभर वर्ष जगला. शंभरव्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. २०११ साली त्याचा मृत्यू झाला.