नागपूर (वृत्तसंस्था) नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांनी एका चिमुकल्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने, वेळीच चिमुकल्याची आई धावून आल्यामुळे बालकाचे प्राण वाचले आहेत. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.
नागपूरमध्ये मंगळवारी एका 3 वर्षांच्या मुलावर पाच-सहा कुत्र्यांनी हल्ला केला. या कुत्र्यांनी मुलाची पॅन्ट पकडून त्याला रस्त्यावर ओढत त्याला घेरले आणि चावायला सुरुवात केली. यानंतर, मुलगा जीवाच्या आकांताने रडू लागला. मुलाचा मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकून त्याची आई धावत आली आणि तिने रस्त्यावरील दगड कुत्र्यांच्या दिशेने भिरकावत आपल्या मुलाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. कुत्र्यांनी चावा घेतल्याने संबंधित चिमुकला जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे समजते.
#WATCH महाराष्ट्र: नागपुर में तीन साल के बच्चे पर आवारा कुत्तों ने हमला किया। (11.04)
(वीडियो सीसीटीवी का है) pic.twitter.com/5A6dQdhVHC
— ANI_HindiNews (@AHindinews) April 13, 2023















