धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपरीषदेमध्ये केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची शासन निर्णयानुसार अंमलबजावणी सुरु आहे. योजनेमध्ये पथविक्रेत्यांना/फेरीवाल्यांना दहा हजार रुपये कर्ज एका वर्षाच्या परतफेडवर बँकेमार्फत विनातारण वितरित करण्यात येत आहे.
कर्ज नियमित परतफेड केल्यास अल्प व्याजदर लागणार असुन व्यवसायात फोन पे/गुगल पे सारख्या डिजिटल व्यवहारास प्राधान्य दिल्यास कॅशबॅकचा फायदा होणार आहे. तसेच या पथविक्रेत्यांनी मुदतीत कर्जफेड केल्यास बँकेकडून दुसऱ्यांदा 20 हजारांचे कर्ज उपलब्ध होणार आहे. धरणगाव शहर नगरपालिका कार्यक्षेत्रात 550 पथविक्रत्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यायचा आहे. शहरातील फेरीवाल्यांनी यासाठी जवळच्या ऑनलाईन सेवा केंद्रावर / सीएससी सेंटरवर जाऊन किंवा मोबाईल वर ऑनलाईन अर्ज करावेत. शहरातील 305 फेरीवाल्यांनी आजपर्यंत ऑनलाईन अर्ज केले असुन 270 लोकांना 10,000 रूपये कर्ज प्राप्त झाले आहेत व नियमित परतफेड केलेल्या लोकांना 20,000/- कर्जही बँकेकडून वितरित करण्यात आले आहेत. वीस हजार नियमित परतफेड करणा-या लोकांना 50,000 रूपये कर्ज प्राप्त होनार आहे अशी माहीती नगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पथविक्रेत्यांनी आजपर्यंत अर्ज केले नसतील त्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज करून लाभ घ्यावा असे आवाहन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी केले आहे. अधिक माहीती साठी पालिकेत तुषार सोनार, सहा प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.