जळगाव (प्रतिनिधी) शहरातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातंर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात दारू पिणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. दरम्यान, याबाबतचे वृत्त ‘द क्लियर न्यूज’ने थोड्या वेळापूर्वीच प्रकाशित केले होते.
जळगाव, धुळे आणि नंदूरबार या तीन जिल्ह्यांसाठी नुकतेच उद्घाटन झालेल्या एमजीपीच्या कार्यालयात चक्क कर्मचाऱ्यांमध्ये दारूची मेहफिल रंगल्याचा खळबळजनक व्हीडीओ ‘द क्लिअर न्यूज’ थोड्यावेळापूर्वी प्रसारित केला होता. कार्यालयातील कॅबिनमधील टेबलावर तीन लोकांसोबत दारूची बाटली, सोडा, चखना आणि पॅक भरलेला दारूचा ग्लास स्पष्ट दिसत होता.
‘द क्लियर न्यूज’ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित करताच जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी ‘एमजीपी’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दारूची पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. दरम्यान, कारवाईचे निर्देश दिल्याच्या वृत्ताला पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक विश्वनाथ पाटील यांनी दुजोरा दिला आहे.