मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या भीतीने वाढत्या जाहिराती देणाऱ्या उत्पादकांना आता आळा घालण्यात येणार आहे. ‘कोरोनाच्या विषाणूंपासून संरक्षण देणारे उत्पादन’, अशा जाहिराती यापुढे बंद होणार आहेत.कोरोना संबंधी फसव्या जाहिराती दाखवताना किंवा प्रकाशित करताना सावधगिरी बाळगावी, असा कडक इशारा भारतीय जाहिरात मानांकन परिषदेने (एएससीआय) दिला आहे. यासंदर्भात मुंबई ग्राहक पंचायतकडून लढा देण्यात आला होता.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि ग्राहकांची कमकुवत मानसिकता लक्षात घेऊन साबणांपासून ते चक्क गाद्या व भिंतीला लावायचे रंगसुद्धा ‘कोरोनारोधक’ कसे आहेत हे सांगणाऱ्या जाहिराती अनेकदा दिसून आल्या आहेत. याचा मुंबई ग्राहक पंचायतने विरोध केला होता. एएससीआयकडे वेळोवळी हा विषय ग्राहक पंचायतने उचलला. त्यानंतर आता त्यासंबंधी परिषदेने इशारा दिला आहे.