अलवर (वृत्तसंस्था) राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय. पीडित विद्यार्थिनी क्लासला गेली होती. त्याचवेळी गावातील तीन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
११ नोव्हेंबर रोजी पिडीत मुलगी क्लाससाठी तिजारा येथे गेली होती. त्याचवेळी गावातील तरूण नवीन तिच्याकडे आला. वडिलांनी बोलावले आहे अशी बतावणी केली. पीडित मुलगी त्याच्यासोबत निघून गेली. त्यानंतर गावातीलच आणखी दोन तरूण त्यांच्याकडे आले. त्यांनी मुलीचं तोंड दाबून तिला दुचाकीवर जबरदस्ती बसवून घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास वडिलांना ठार मारू अशी धमकीही आरोपींनी तिला दिली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी घटनेचा व्हिडिओ काढला. त्यानंतर तो व्हायरलही केला.