धरणगाव (प्रतिनिधी) व्यक्तिमत्व विकासासाठी स्नेह संमेलन अतिशय उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन निमित्ताने प्राप्त झालेल्या व्यासपीठाचा विधायक उपयोग करून घ्यावा. हे व्यासपीठ म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलाविष्कारासाठी प्राप्त झालेली एक संधी आहे. विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे गुण स्नेहसंमेलनामध्येच विकसित होत असतात. लहानपणी माझे वकृत्त्व ही चांगले होते. त्यामुळे मी राजकारणाच्या शाळेत आलो.. तेव्हा मी गुरूजी होऊ शकलो नाही मात्र आज जिल्ह्याचा पालकमंत्री असून समाधानी आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच विविध कलागुण जोपासावेत असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांपुढे बोलतांना केले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डी.जी. पाटील हे होते.
धरणगाव येथिल पू. गो. गं. वाजपेयी गुरुजी शिक्षण सह्याद्री शिक्षणप्रसारक मंडळ संचलित प्रा. व्ही. जी. पाटील प्राथमिक विद्या मंदीर, इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या स्नेह संमेलन कार्यक्रमांमध्ये प्रथम आलेल्या, जिल्हास्तरावर वकृत्व स्पर्धेत तसेच बोर्डात १० वी, १२ वीत प्रथम आलेल्या विद्यर्थ्यांना , शालेय निबंध, चित्रकला व क्रिडा स्पर्धेत प्रथम, द्वितीय, व तृतीय आलेल्या विद्यर्थ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येवून त्यांचा सत्कार करण्यात आला . स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा वाखाण्याजोगा होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बळवंत पाटील यांनी स्नेसंमेलन व शाळेच्या सुरू असलेल्या व भविष्यात सुरू करावयाचे विविध शैक्षणिक उपक्रमाबात साविस्तर माहिती विशद केली. बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षक किरण चव्हाण यांनी केले तर आभार उपशिक्षिका आर.पी. जैन यांनी मानले. स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य , मुख्याध्यापक शिक्षक वृंद व विद्यर्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.