चोपडा (प्रतिनिधी) तांडे, शिरपूर येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित मुकेशभाई आर. पटेल मुला-मुलींची सैनिकी शाळा व ज्युनियर कॉलेज (विज्ञान) आयोजित सब ज्युनिअर मुले व मुलींच्या हँडबॉल स्पर्धा २०२४ चे उद्घाटन दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ शनिवार रोजी करण्यात आले.
यावेळी रुपेश मोरे जुनियर हँडबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव, राजाराम राऊत सरचिटणीस हँडबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या स्पर्धेत करिता संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण २२ संघांचा समावेश असून तरुण खेळाडूंना आपले कौशल्य व सांघिक कार्य दाखविण्याची उत्तम संधी प्राप्त करून दिलेली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समयी मुकेशभाई आर. पटेल मुला मुलींची सैनिकी शाळा येथील विद्यार्थ्यांनी मार्चपास करून उपस्थित सर्व खेळाडूंची व रसिकांची मने जिंकली. तसेच सैनिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेला बँड शो हा या उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण ठरले. ही क्रीडा स्पर्धा दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ ते २६ नोव्हेंबर २०२४ अशी संपन्न होणार असून या स्पर्धेत पंधरा वर्षाखालील मुलांच्या बारा आणि मुलींच्या दहा संघांचा समावेश असून एकूण २२ संघ यामध्ये सहभागी होत असून सर्व सामने अत्यंत चुरशीचे होणार आहेत.
या क्रीडा स्पर्धेच्या समारोप २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ वाजता होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मान्यवर श्री राजाराम राऊत यांनी आपल्या मनोगतात सर्व खेळाडूंना चारित्र्य घडविण्यासाठी आणि युवकांमध्ये एकता वाढवण्यासाठी खेळाचे महत्व हे अनन्यसाधारण नसून प्रत्येकाने ते जोपासले पाहिजे असे आवाहन आपल्या मनोगतात त्यांनी सर्व खेळाडूंकडून व्यक्त केले. तसेच सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य दिनेश कुमार राणा यांनी ही स्पर्धा अत्यंत उत्तम पद्धतीने साकार होण्याकरिता मॅनेजमेंट स्वयंसेवक आणि सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार मानले व निपक्षपातीपणे ही स्पर्धा संपन्न व्हावी यासाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. किरण आंचन एस. व्ही. के. एम संस्थेचे स्पोर्ट्स संचालक विकी यांचे संचालक यांनी केले. यांनी आपल्या प्रास्ताविकात खेळाडूंमध्ये असणारे तारुण्य ऊर्जा शक्ती व टीमवर्क यासाठी प्रत्येक खेळाडूने प्रयत्नशील राहावे असे आवाहन सर्व खेळाडूंना केले व या स्पर्धेचा प्रत्येक खेळाडूने आनंद घ्यावा ही भावना व्यक्त केली.
या उद्घाटन प्रसंगी श्री. रुपेश मोरे ज.टा. सेक्रेटरी हँडबॉल असोसिएशन ऑफ इंडिया, श्री. राजाराम राऊत सरचिटणीस हँडबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, श्री. साई कृष्णा हतांगडी अध्यक्ष, मुंबई हँडबॉल अकादमी, श्री. आनंद माने भारत आंतरराष्ट्रीय कनिष्ठ संघ प्रशिक्षक आणि भारतीय व्हीलचेअर संघ प्रशिक्षक श्री.राजेश गर्दे ज.टी. सचिव, हँडबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि सचिव, रत्नागिरी हँडबॉल असोसिएशन, श्री. राकेश ठाकरे सचिव, पालघर हँडबॉल असोसिएशन, प्रवीण कदम राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू, नितीन घारे राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू, श्री. विजय हिरालाल अग्रवाल, श्री अतुल राजगोपाल भंडारी, श्री. उमेश शर्मा श्री.प्रितेश पटेल यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.